scorecardresearch

Premium

VIDEO: शुबमन गिलने सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निहारिका एनएमची घेतली फिरकी, म्हणाला, “मी भारतीय…”

Shubman Gill Viral Video: डब्ल्यूटीसी फायनल सामन्यापूर्वी शुबमन गिलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शुबमन गिलसोबत सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निहारिका एनएम गप्पा मारताना दिसत आहे.

Niharika NM and Shubman Gill Video Viral
शुबमन गिल आणि निहारिका एनएम (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Shubman Gill Says I Am Indian Spider Man: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात डब्ल्यूटीसीचा फायनल सामना खेळला जाणार आहे. या सामन्याला ७ जूनपासून इंग्लमध्ये सुरुवात होईल. या सामन्यात भारतीय संघाच्या युवा सलामीवीर शुबमन गिल सर्वांच्या नजरा असणार आहेत. कारण आयपीएलच्या सोळाव्या हंगामात त्याने सर्वाधिक धावा केल्या होत्या. अशात सोशल मीडियावर शुबमन गिलचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे.

मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये शुबमन गिल सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निहारिका एनएमशी बोलत आहे. निहारिका एनएम आणि शुबमन गिल अनेक मनोरंजक विषयांवर बोलताना दिसत आहेत.

virat kohli
विराट कोहलीची विश्वचषकातून माघार? तातडीने मुंबईला रवाना झाल्याने चर्चांना उधाण
Sharad Pawar NCP
“ते सहसा माझ्या शब्दाला नकार देत नाहीत”; शरद पवारांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा, म्हणाले…
asim sarode on rahul narvekar (1)
“अध्यक्षांनी अपात्रतेबाबत चुकीचा निर्णय दिला, तर…”, कायदेतज्ज्ञ असीम सरोदेंचं मोठं वक्तव्य
उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीने कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण?

निहारिका आणि शुबमनचा व्हिडीओ व्हायरल –

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये, जेव्हा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर निहारिका एनएम शुबमन गिलला विचारते, तुला कोणता खेळ आवडतो? या प्रश्नाच्या उत्तरात शुबमन गिल म्हणतो की, मी क्रिकेट खेळतो. यानंतर जेव्हा शुबमन गिल निहारिका एनएमला विचारतो की, तुला चित्रपट पाहायला आवडतात का? तर निहारिका एनएम सांगते की, मला चित्रपट पाहायला आवडतात. अशा प्रकारे दोघांमध्ये संभाषण सुरू होते… तसेच निहारिका एनएम पुढे म्हणते की, मला सुपरहिरोसारखे चित्रपट खूप आवडतात.

मी भारतीय स्पायडर मॅन आहे – शुबमन

यानंतर शुबमन गिल म्हणतो की, ‘मी भारतीय स्पायडर मॅन आहे.’ तेव्हा निहारिका एनएम म्हणते की मला तुला काही सांगायचे आहे… मी प्रियांका चोप्रा आहे. निहारिका एनएम पुढे म्हणते की, मला स्पायडर मॅन चित्रपट खूप आवडतो, कारण या चित्रपटात अनेक चढ-उतार आहेत. मात्र, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. याशिवाय सोशल मीडिया यूजर्स सतत कमेंट करून आपली प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा – Sakshi Murder Case: गुजरात टायटन्सचा बॉलर यश दयाल इन्स्टाग्राम स्टोरीमुळे अडचणीत; ‘लव्ह जिहाद’ची ‘ती’ पोस्ट डिलीट करत मागितली माफी!

शुबमन गिल आयपीएल २०२३ च्या हंगामाचा ऑरेंज कॅप विजेता राहिला आहे. या खेळाडूने आयपीएल २०२३च्या हंगामात सर्वाधिक धावा केल्या. शुबमन गिलने १७ सामन्यात ५९.३३च्या सरासरीने ८९० धावा केल्या. तसेच, त्याने तिनदा शतक झळकावण्याचा पराक्रम केला. त्याचबरोबर आता तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या डब्ल्यूटीसी फायनल सामन्याठी टीम इंडियाचा भाग आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Watch video shubman gill told niharika nm i am indian spider man vbm

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×