Suryakumar Yadav Viral Video: भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर सुरु आहे. या मालिकेआधी भारतीय संघ आयर्लंडचा सामना करण्यासाठी मैदानात उतरला होता. या दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली, त्यावेळी भारतीय संघात सर्वात मोठा बदल करण्यात आला होता. तो म्हणजे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं होतं.दरम्यान सूर्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात त्याला भारतीय संघाबाबत प्रश्न विचारण्यात आला.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाना मान पटकावला होता. पण वर्ल्डकपविजेत्या कर्णधाराला बीसीसीआयने कर्णधारपदावरुन काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. कारण सूर्या कर्णधार म्हणून हिट राहिला असला तरीदेखील फलंदाजीत तो नावाला साजेशी कामगिरी करु शकला नव्हता. टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत आणि त्यानंतर झालेल्या आयपीएल २०२६ स्पर्धेतही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. त्यामुळे बीसीसीआयने त्याला कर्णधारपदावरुन काढलं आणि संघाबाहेर करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
सूर्याचा व्हिडीओ होतोय व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यात सूर्यकुमार यादव हेअरकट करायला गेला असल्याचं दिसून येत आहे. यादरम्यान एक चाहता त्याला म्हणाला, “भावा, आम्ही तुला या मालिकेत खूप मिस करतोय…” यावर उत्तर देताना सूर्या म्हणाला , “मला? अरे चांगलं तर खेळत आहेत ते लोकं…” सूर्यकुमार यादव फलंदाजीत फ्लॉप राहिला असला तरीदेखील त्याने कर्णधार म्हणून दमदार कामगिरी केली होती. त्याच्या नेतृत्वात भारताने एकही मालिका गमावली नव्हती. पण आता तो संघाबाहेर आहे आणि संघाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे आहे.
सूर्यकुमार यादवच्या नेतृ्त्वाखाली खेळताना भारतीय संघाने आशिया चषक आणि आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. पण श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून हवी तशी सुरुवात करता आलेली नाही. भारत आणि आयर्लंड या दोन्ही संघांमध्ये झालेल्या टी-२० मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला होता. भारताने याआधी आयर्लंडविरुद्ध खेळताना एकही सामना गमावला नव्हता. पण भारताने यावेळी मालिका गमावली.
