West Indies Squad For IND vs WI ODI Series: काही दिवसांपूर्वी भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ३-० ने विजय मिळवला. या मालिकेनंतर एक संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. तर दुसरा संघ वेस्ट इंडिजविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. २७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वनडे आणि टी -२० मालिकेसाठी वेस्ट इंडिजने आपला संघ जाहीर केला आहे. या दोन्ही संघांच्या नेतृत्वाची जबाबदारी शे होपकडे सोपवण्यात आली आहे. वेस्ट इंडिजने आपल्या मुख्य संघात बदल केलेला नाही. जो संघ श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या संघात खेळण्यासाठी उतरला होता, तोच संघ भारतीय संघाचा सामना करताना दिसून येणार आहे.

भारतीय संघाने वनडे मालिकेसाठी आधीच भारतीय संघाची घोषणा केली आहे. श्रेयस अय्यर आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. त्यामुळे वनडे संघात ऋतुराज गायकवाडला पुनरागमन करण्याची संधी मिळाली आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजकडून काही नवे चेहरे पदार्पण करताना दिसून येऊ शकतात.

भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे वेस्ट इंडिजचा संघ:

शे होप (कर्णधार), ज्वेल अँड्र्यू, जॉन कॅम्पबेल, कीसी कार्टी, रोस्टन चेज, मॅथ्यू फोर्ड, जस्टिन ग्रीव्स, आमिर जंगू, अलजारी जोसेफ, शमार जोसेफ, विटेल लॉज, गुडाकेश मोती, किमो पॉल, शरफेन रदरफोर्ड आणि जेडेन सील्स.

आशियाई क्रीडा स्पर्धा सुरू असताना भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. वनडे मालिकेची सुरुवात २७ सप्टेंबरपासून होणार आहे. पहिला वनडे सामना २७ सप्टेंबरला, दुसरा सामना ३० सप्टेंबरला आणि मालिकेतील शेवटचा सामना ३ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.

वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ :

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल (यष्टिरक्षक), ऋतुराज गायकवाड़, ध्रुव जुरेल (राखीव यष्टिरक्षक), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, प्रसिध कृष्णा, गुरनूर ब्रार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जैस्वाल आणि नमन धीर