WI vs SA 2nd T20I Highlights: वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका संघांमध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेत वेस्ट इंडिजने पहिले दोन्ही सामने जिंकून मालिका आपल्या नावे केली आहे. ब्रायन लारा क्रिकेट अकादमीमध्ये येथे खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात १७९ धावांचे लक्ष्य राखून वेस्ट इंडिजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची सलग तिसरी मालिका जिंकली.

रीझा हेंड्रिक्सच्या २४४.४४च्या स्ट्राईक रेटने १८ चेंडूत केलेल्या ४४ धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ मजबूत स्थितीत होता. त्यांनी १४व्या षटकापर्यंत ३ गडी बाद १२९ धावा केल्या होत्या, परंतु ३५ चेंडूत २० धावांत ७ विकेट गमावल्याने संघ १९.४ षटकात १४९ धावा करत ऑल आऊट झाला आणि ३० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले.

Tim Southee quits New Zealand Test captaincy Ahead of IND vs NZ Test Series
IND vs NZ: भारत दौऱ्यापूर्वी टीम साऊदीकडून न्यूझीलंडच्या कर्णधारपदाचा राजीनामा, ‘या’ खेळाडूकडे संघाची कमान
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
SA vs IRE 2nd T20 Highlights in Marathi
SA vs IRE 2nd T20 : आयर्लंडचा ऐतिहासिक विजय! प्रथमच बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा १० धावांनी उडवला धुव्वा
WTC Points Table Sri Lanka Beat New Zealand and Improve PCT on 3rd Spot
WTC Points Table: श्रीलंकेमुळे ऑस्ट्रेलियाचा WTC अंतिम फेरीचा मार्ग खडतर; कसोटी मालिकेत न्यूझीलंड संघावर मिळवला एकतर्फी विजय
Cameron Green Doubtful For Border-Gavaskar Trophy After Sustaining Back Injury In England ODIs
भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का, ‘या’ स्टार अष्टपैलू खेळाडूला झाली दुखापत
SL beat NZ By 63 Runs in 1st Test and Sri Lanka secure 3rd Spot in WTC Points Table
SL vs NZ: श्रीलंकेची WTC गुणतालिकेत जोरदार मुसंडी; न्यूझीलंडचं अंतिम फेरीचं स्वप्न विरणार?
Travis Head Broke Rohit Sharma Record in ENG vs AUS ODI
ENG vs AUS: ट्रेव्हिस हेडने विक्रमी खेळीसह मोडला रोहित शर्माचा वनडेमधील मोठा विक्रम, ‘बॅझबॉल’चाही उडवला धुव्वा
Bangladesh Captain Big Statement Ahead of IND vs BAN test Series
IND vs BAN: “ते क्रमवारीत पुढे असले तरी…”, कसोटी मालिकेआधी बांगलादेशच्या कर्णधाराचं भारतीय संघाला आव्हान, नेमकं काय म्हणाला?

हेही वाचा – PAK vs BAN: शकिब अल हसनने रागाच्या भरात मोहम्मद रिझवानला फेकून मारला चेंडू, पंचांनीही घेतला आक्षेप; पाहा VIDEO

दुसऱ्या टी-२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजने २० षटकांत ६ गडी गमावून २७९ धावा केल्या. शाई होपने संघाकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४१ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार रोवमन पॉवेलने ३५ धावा केल्या. सरफेन रदरफोर्डने १८ चेंडूंत ३ चौकार आणि दोन षटकारांसह २९ धावा केल्या. या खेळाडूंमुळेच वेस्ट इंडिज संघाला सन्मानजनक धावसंख्या उभारता आली.

ट्रिस्टन स्टब्स आणि डोनोव्हन फरेरा यांना बाद करून अकेल होसेन आणि गुडाकेश मोतीने वेस्ट इंडिजला महत्त्वपूर्ण विकेट मिळवून दिल्या. यानंतर रोमॅरियो शेफर्ड आणि शामर जोसेफ यांनी दक्षिण आफ्रिकेला सर्वबाद केले. शेफर्डने चार षटकांत १५ धावांत ३ विकेट घेतले आणि जोसेफने ३१ धावांत ३ विकेट घेतले. या दोघांनी मिळून मालिकेत बरोबरी साधण्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या आशा धुळीस मिळवल्या.

हेही वाचा – PAK vs BAN: पाकिस्तानचा घरच्या मैदानावर लाजिरवाणा पराभव, कसोटी क्रिकेटच्या इतिहासात बांगलादेशने पहिल्यांदा मिळवला विजय

वेस्ट इंडिजची फलंदाजी

वेस्ट इंडिजने या मैदानावर दोन दिवसांपूर्वी १७५ धावांचा सर्वात यशस्वी लक्ष्य पाठलाग केला होता. दक्षिण आफ्रिकेची सुरुवात वेगवान झाली. त्यांनी दहा षटकांत १०० धावा केल्या, परंतु वेस्ट इंडिजने १०व्या आणि १४व्या षटकांमध्ये फक्त एक चौकार मारण्याची संधी दिली. अशा स्थितीत दक्षिण आफ्रिकेने दडपणाखाली येऊन सामना गमावला. दक्षिण आफ्रिकेच्या खालच्या फळीने अत्यंत खराब कामगिरी केली. शेवटच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही.

हेही वाचा – Rohit Sharma Shikhar Dhawan: “तू नेहमीच माझ्यासाठी…” रोहित शर्माची ‘अल्टीमेट जाट’साठी खास पोस्ट, धवनबरोबरचे जुने फोटो केले शेअर

वेस्ट इंडिजच्या फलंदाजीबद्दल बोलायचे तर शाई होपने २२ चेंडूत ४१ धावा केल्या आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने २२ चेंडूत ३५ धावा केल्या. शेरफेन रदरफोर्डने १८ चेंडूत २९ आणि अलिक अथनाजेने २१ चेंडूत २८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेकडून लिझार्ड विल्यम्सने ३६ धावांत ३ विकेट घेतले. पॅट्रिक क्रुगरने २ विकेट घेतले. ओटेनिल बार्टमनने १ विकेट घेतली.