scorecardresearch

आयपीएल सुरु असतानाच किरॉन पोलार्डचा धक्कादायक निर्णय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतला संन्यास

वेस्ट इंडिज क्रिकेट संघाचा कर्णधार किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

kieron pollard
kieron pollard (संग्रहित फोटो)

वेस्ट इंडिजचा दिग्गज क्रिकेटपटू किरॉन पोलार्डने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. सध्या तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतोय. त्याने अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.

किरॉन पोलार्डने सोशल मीडियाद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचं म्हटलं आहे. मुंबई संघाने एकूण पाच वेळा जेतेपद पटकावलेले असले तरी या हंगामात मुंबई संघ चांगली कामगिरी करु शकलेला नाही. किरॉन पोलार्ड सध्या याच संघाकडून खेळतोय. आयपीएलचा हा हंगाम अद्याप संपलेला नाही. असे असताना त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतल्याचं जाहीर केलंय.

हेही वाचा >>> IPL वर करोनाचं सावट, २२ एप्रिल रोजीच्या राजस्थान-दिल्ली सामन्याबाबत घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

“दहा वर्षांचा होतो तेव्हापासून वेस्ट इंडिज संघाचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न होते. मी मागील १५ वर्षांपासून एकदीवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करतोय. मात्र आता पूर्ण विचाराअंती मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे,” असे पोलार्डने सांगितले आहे.

हेही वाचा >>> विश्लेषण : दिनेश कार्तिक का आहे चर्चेत? टी-२० विश्वचषकासाठी तो संघात हवा का?

किरॉन पोलर्ड आतापर्यंत १२३ एकदिवसीय तर १०१ टी-२० सामन्यांमध्ये खेळलेला आहे. त्याने एप्रिल २००७ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. तर २००८ साली त्याने ऑस्ट्रेलियाविरोधात खेळताना टी-२० क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली होती. पोलार्ड सध्या मुंबई इंडियन्सकडून आयपीएल खेळत आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: West indies cricketer kieron pollard retired from international cricket prd

ताज्या बातम्या