नवी दिल्ली : आशिया चषक क्रिकेट स्पर्धेनंतर आठवडय़ाभरात भारतासमोर वेस्ट इंडिजचे आव्हान समोर असणार आहे. त्यातील चौथा एकदिवसीय सामना मुंबईत होईल. दोन कसोटी, पाच एकदिवसीय आणि तीन ट्वेन्टी-२० सामन्यांचा समावेश असलेल्या या सात आठवडय़ांच्या वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याला ४ ऑक्टोबरला पहिल्या कसोटीने प्रारंभ होणार आहे. यापैकी एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना २७ ऑक्टोबरला पुण्यात होईल, तर चौथा सामना २९ ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.
कसोटी मालिका
१. ४ ते ८ ऑक्टोबर राजकोट
२. १२ ते १६ ऑक्टो. हैदराबाद
एकदिवसीय मालिका
१. २१ ऑक्टोबर गुवाहाटी
२. २४ ऑक्टोबर इंदूर
३. २७ ऑक्टोबर पुणे
४. २९ ऑक्टोबर मुंबई
५. १ नोव्हेंबर थिरुवनंतपूरम
ट्वेन्टी-२० मालिका
१. ४ नोव्हेंबर कोलकाता
२. ६ नोव्हेंबर लखनौ
३. ११ नोव्हेंबर चेन्नई