Video: ड्वेन ब्रावोच्या ‘वर्ल्ड चॅम्पियन’ गाण्यावर थिरकले वेस्ट इंडिजचे खेळाडू

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोच्या नव्या गाण्यावर वेस्ट इंडिजचे खेळाडू थिकरले आहेत. ड्वेन ब्रावोने नुकतंच वर्ल्ड चॅम्पियन या गाण्याचं टीझर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे.

dwayne_Bravo
(Photo- Instagram Video Grab)

वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रावोच्या नव्या गाण्यावर वेस्ट इंडिजचे खेळाडू थिकरले आहेत. ड्वेन ब्रावोने नुकतंच वर्ल्ड चॅम्पियन या गाण्याचं टीझर इन्स्टाग्रामवर पोस्ट केलं आहे. २५ सेंकदाच्या या व्हिडिओत ब्रावोसोबत वेस्ट इंडिजचे खेळाडू ठेका धरताना दिसत आहेत. ब्रावोच्या मागच्या गाण्याप्रमाणेच या गाण्यातही उत्साह आणि कॅरेबियन तडका असल्याचं दिसत आहे. या गाण्यात ख्रिस गेल, किरोन पोलार्ड, आंद्रे फ्लेचर, फॅबियन एलेन आणि सुनील नरिन सारखे खेळाडू नाचताना दिसत आहेत.

“मरून टीमच्या चाहत्यांसाठी वर्ल्ड चॅम्पियन गाणं तयार आहे. या गाण्याचा आनंद घ्या आणि टीमला सपोर्ट करा”, असं कॅप्शन पोस्ट केलेल्या गाण्याला लिहिलं आहे. त्याचबरोबर पूर्ण गाणं लवकरच प्रदर्शित केलं जाईल, अशी माहिती दिली आहे. गाण्याचं टीझर इन्स्टाग्रामवर टाकल्यानंतर १,४०,००० हून अधिक लोकांनी पाहिला आहे. ४५ हजारांहून अधिक जणांनी लाइक्स केलं आहे.

ब्रावोने हे गाणं भारतीत २०१६ मध्ये झालेल्या टी २० वर्ल्डकपमध्ये वेस्ट इंडिजच्या विजयासाठी समर्पित केलं आहे. वेस्ट इंडिजने अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं. टी २० वर्ल्डकप २०२१ स्पर्धेत वेस्ट इंडिजचा पहिला सामना २३ ऑक्टोबरला इंग्लंडविरूद्ध आहे.

वेस्ट इंडिज

कायरन पोलार्ड (कप्तान), निकोलस पूरन, ख्रिस गेल, अकिल हुसैन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, अल्फोन्सो थॉमस, हेडन वॉल्श.

राखीव : डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉटरेल, जेसन होल्डर, गुडाकेश मोटी

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West indies players dance dwayne bravo song world champion rmt

Next Story
हॉकीबाबतचा फैसला ३ नोव्हेंबरला
ताज्या बातम्या