आयपीएल २०२१च्या एलिमिनेटर सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सुपरहिट ठरलेल्या कोलकाता नाइट रायडर्सचा फिरकीपटू सुनील नरिनबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या नरिनला आगामी टी-२० विश्वचषक २०२१ साठी वेस्ट इंडीज संघात स्थान मिळणार नाही. वेस्ट इंडिजला आपला अंतिम संघ रविवारपर्यंत आयसीसीकडे सादर करायचा आहे. पण त्याआधी नरिनबाबत हे वृत्त समोर आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शारजाहमध्ये आरसीबीविरुद्ध नरिनने २१ धावांत चार विकेट घेतल्या, ज्यात विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलच्या विकेटचा समावेश होता. यानंतर, नरिनने फलंदाजीत एका षटकात तीन षटकार मारून केकेआरच्या बाजूने सामना फिरवला. केकेआर आज बुधवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध दुसरा क्वालिफायर सामना खेळेल. आयपीएल २०२१ च्या यूएई लेगमध्ये नरेनने ८ सामन्यांत ११ बळी घेतले.

मात्र, सुनील नरिन ऑगस्ट २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. गेल्या महिन्यात टी-२० विश्वचषक २०२१ साठी वेस्ट इंडीज संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा नरेनचे नाव त्यात समाविष्ट नव्हते. नरिन बोर्डाने ठरवलेल्या तंदुरुस्तीच्या निकषांची पूर्तता करत नसल्याची नोंद करण्यात आली.

हेही वाचा – T20 World Cup : टीम इंडियानं नवी जर्सी लाँच करताच रोहितवर खिळल्या नजरा; ‘ती’ कृती ठरलीय कौतुकास्पद!

मुंबई इंडियन्सकडून खेळणारा आणि वेस्ट इंडिजचा कप्तान कायरन पोलार्डने ईएसपीएनक्रिकइन्फोला सांगितले, “जर मी त्याला संघात समाविष्ट न करण्याच्या कारणांबद्दल बोललो, तर ते वक्तव्य वेगळे होईल. आता आपल्याकडे असलेल्या १५ खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले तर अधिक चांगले. हे आमच्यासाठी अधिक महत्वाचे आहे. आम्ही या खेळाडूंसह आमच्या जेतेपदाचा बचाव करू शकतो का यावर काम करावे लागेल. मला यावर टिप्पणी करायची नाही. यावर बरेच काही सांगितले गेले आहे. मला वाटते की त्याला संघात समाविष्ट न करण्याची कारणे त्यावेळी स्पष्ट केली गेली. वैयक्तिकरित्या, मी सुनील नरिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूपेक्षा चांगला मित्र मानतो. आम्ही एकत्र खेळून मोठे झालो. तो जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे.”

टी–२० विश्वचषकासाठी वेस्ट इंडिज संघ

कायरन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पूरन, फॅबियन एलन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, ओबेद मॅककॉय, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, ओशाने थॉमस, हेडन वॉल्श जूनियर.

राखीव खेळाडू : डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर, अकिल होसेन.

मराठीतील सर्व आयपीएल २०२१ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: West indies skipper kieron pollard says they not add sunil narine to their t20 world cup squad adn
First published on: 13-10-2021 at 16:14 IST