Ind vs WI : पहिल्या टी-२० साठी भारतीय संघाची घोषणा

कृणाल पांड्याला १२ जणांच्या संघात स्थान

पहिल्या टी-२० सामन्याआधी सराव करताना भारतीय संघ

विंडीजविरुद्ध वन-डे मालिकेत ३-१ असा विजय मिळवल्यानंतर भारतीय संघ उद्यापासून ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर हा सामना रंगणार असून भारताने पहिल्या सामन्यासाठी १२ जणांच्या संघाची घोषणा केली आहे. धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंत यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळणार आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे कृणाल पांड्याला १२ जणांच्या संघात स्थान देण्यात आलं आहे.

अवश्य वाचा – धोनीच्या अनुपस्थितीत ऋषभ पंतला चांगली संधी – रोहित शर्मा

पहिल्या टी-२० साठी भारतीय संघ पुढीलप्रमाणे –

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), मनिष पांडे, दिनेश कार्तिक, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलिल अहमद, युझवेंद्र चहल

अवश्य वाचा – विराट खेळत असताना प्रत्येक विक्रम धोक्यात – गावसकर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: West indies tour of india 2018 team india management announced 12 member squad for 1st t20i against west indies

ताज्या बातम्या