दक्षिण आफ्रिकेच्या संघाने वेस्ट इंडिजवर दणदणीत विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने सेमी फायनलमध्ये जवळपास प्रवेश केला. ८३/७ स्थितीतून वेस्ट इंडिजने १७६ धावांची मजल मारली. मात्र एडन मारक्रम, क्विंटन डी कॉक आणि रायल रिकलटन या त्रिकुटाच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने ९ विकेट्सने बाजी मारली.

Live Updates

WI vs SA Live Cricket Score, West Indies vs South Africa T20 World Cup Live Score, Scorecard Updates:

17:57 (IST) 26 Feb 2026

मारक्रम-रिकलटनची जोडी जमली

एडन मारक्रम आणि रायल रिकलटन या जोडीने दक्षिण आफ्रिकेला विजयासमीप नेलं आहे. वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांना नामोहरम करत या जोडीने विजय सुकर केला आहे.

17:38 (IST) 26 Feb 2026

कर्णधार एडन मारक्रमचं अर्धशतक

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने खणखणीत अर्धशतक झळकावत विजयाचा पाया रचला आहे.

17:34 (IST) 26 Feb 2026

फटकेबाजीनंतर क्विंटन डी कॉक तंबूत

संथ सुरुवात करून नंतर जोरदार फटकेबाजी करणाऱ्या क्विंटन डी कॉकला रॉस्टन चेसने बाद केलं. त्याने २४ चेंडूत ४७ धावांची खेळी केली.

17:24 (IST) 26 Feb 2026

शामर जोसेफच्या पहिल्या षटकात लुटल्या १६ धावा

क्विंटन डी कॉक आणि एडन मारक्रम यांनी वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज शामर जोसेफच्या पहिल्याच षटकात १६ धावा चोपून काढल्या.

17:20 (IST) 26 Feb 2026

दक्षिण आफ्रिकेचं अर्धशतक

कर्णधार एडन मारक्रमच्या वेगवान खेळीच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने पाचव्या षटकात अर्धशतकाचा टप्पा ओलांडला.

17:08 (IST) 26 Feb 2026

मारक्रमला मिळालं जीवदान

चौकार-षटकारांनिशी सुरुवात करणाऱ्या एडन मारक्रमला ब्रँडन किंगने जीवदान दिलं. मॅथ्यू फोर्डच्या गोलंदाजीवर मारक्रमने मारलेला फटका अडवण्याचा प्रयत्न किंगने केला. चेंडू त्याच्या हाताला लागला. उपचारांसाठी त्याला मैदान सोडावं लागलं.

17:06 (IST) 26 Feb 2026

एडन मारक्रमची आक्रमक सुरुवात

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने वेस्ट इंडिजविरुद्धच्या लढतीत आक्रमक सुरुवात केली आहे.

16:42 (IST) 26 Feb 2026

वेस्ट इंडिज १७६; होल्डर-शेफर्ड भागीदारीने तारलं

जेसन होल्डर आणि रोमारिओ शेफर्ड यांनी आठव्या विकेटसाठी केलेल्या ५७ चेंडूत ८९ धावांच्या भागीदारीमुळे वेस्ट इंडिजने १७६ धावांची मजल मारली. वेस्ट इंडिजची ८३/७ अशी घसरगुंडी उडाली होती.

15:43 (IST) 26 Feb 2026

वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत

दक्षिण आफ्रिकेच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजची भंबेरी उडाली आहे. त्यांचे पाच शिलेदार तंबूत परतले आहेत.

15:23 (IST) 26 Feb 2026

लुंगी एन्गिडीचा दणका

लुंगी एन्गिडीने एकाच षटकात ब्रँडन किंग आणि रॉस्टन चेस यांना परतीचा रस्ता दाखवला आहे.

15:17 (IST) 26 Feb 2026

शिमोरन हेटमायर माघारी

शिमोरन हेटमायर जीवदान मिळाल्यानंतरही खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. कागिसो रबाडाच्या चेंडूवर कार्बिन बॉशने त्याचा झेल सोडला. मात्र पुढच्याच चेंडूवर केशव महाराजने त्याचा अफलातून झेल टिपला.

15:11 (IST) 26 Feb 2026

वेस्ट इंडिजचा कर्णधार शे होप तंबूत

आक्रमक सुरुवात करणाऱ्या शे होपला कागिसो रबाडाने दुसऱ्याच चेंडूवर माघारी परतावलं.

15:05 (IST) 26 Feb 2026

केशव महाराजच्या षटकात लुटल्या १७ धावा

वेस्ट इंडिजने पहिल्याच षटकात १७ धावा चोपून काढल्या.

14:42 (IST) 26 Feb 2026

वेस्ट इंडिज संघात अकेल हुसेनऐवजी रॉस्टन चेस

वेस्ट इंडिज- शे होप, ब्रँडन किंग, शिमोरन हेटमायर, रोव्हमन पॉवेल, शेरफन रुदरफोर्ड, रॉस्टन चेस, जेसन होल्डर, रोमारिओ शेफर्ड, मॅथ्यू फोर्ड, गुदकेश मोटी, शामर जोसेफ.

दक्षिण आफ्रिका- एडन मारक्रम, क्विंटन डी कॉक, रायल रिकलटन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्ज, मार्को यान्सन, कार्बिन बॉश, कागिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एन्गिडी

14:36 (IST) 26 Feb 2026

दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला, बॉलिंगचा निर्णय

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मारक्रमने टॉस जिंकला असून, त्याने बॉलिंगचा निर्णय घेतला. दक्षिण आफ्रिकेच्या संघात कोणतेही बदल नाहीत.

[caption id="attachment_5518219" align="alignnone" width="670"]West indies vs south africa t20 world cup super 8 match

WI vs SA Live Cricket Score, West Indies vs South Africa T20 World Cup Today Match Live Cricket Score Updates: