WTC Final 2023 updates: लंडनच्या ओव्हल मैदानावर ७ जूनपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंसमोर सर्वात मोठे आव्हान असेल ते आयपीएल टी२० फॉरमॅटमधून बाहेर पडण्याचे. अशा परिस्थितीत छोट्या फॉरमॅटमधून कसोटी क्रिकेटमध्ये स्वत:ला कसे अॅडजस्ट करायचे, याची चिंता महान क्रिकेटपटू सुनील गावसकर यांना सतावत होती. मात्र, गावसकर यांनी” चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्यावर संघाची सारी भिस्त असून तेच यातून मार्ग काढतील असे म्हटले. युवा खेळाडूंमुळे भारतीय संघाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.” असेही ते पुढे म्हणाले.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ७ जूनपासून ‘द ओव्हल’ येथे WTC फायनल खेळेल, ज्यामध्ये इंडियन प्रीमियर लीग मध्ये खेळणारे बहुतेक खेळाडू पोहोचले आहेत. रवींद्र जडेजाही लवकरच संघात सामील होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सच्या पाचव्या ट्रॉफीच्या विक्रमाशी बरोबरी करत आयपीएल सोमवारी संपली. गावसकर यांनी स्टार स्पोर्ट्सवर सांगितले की, “सर्वात मोठी परीक्षा ही असेल की प्रत्येकजण टी२० फॉरमॅट गेले तीन महिने खेळत आहे आणि कसोटी क्रिकेट हा खुपवेळ संयम ठेवून खेळण्याचा फॉरमॅट आहे. मला वाटतं ते या खेळाडूंसाठी थोडे जुळवून घ्यायला आव्हानात्मक असणार आहे.”

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
IPL 2024: षटकारांच्या हॅटट्रिकनंतर धोनीने पुन्हा जिंकली मनं, हार्दिकची धुलाई केलेला चेंडू चाहतीला दिला भेट
IPL 2024 RR vs PBKS Match Updates in marathi
PBKS vs RR : युजवेंद्र चहलला इतिहास रचण्याची सुवर्णसंधी! IPL मध्ये ‘ही’ कामगिरी करणारा ठरणार पहिलाच गोलंदाज
Green signal for Suryakumar Yadav to play in IPL
IPL 2024 : मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी! सूर्यकुमार यादव झाला तंदुरुस्त, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

हेही वाचा: IPL2023: “माही भाई आपके लिए तो कुछ भी…” धोनीने रवींद्र जडेजाला CSKमध्ये राहण्यासाठी कसे पटवले? जाणून घ्या

फक्त पुजाराने स्वत:ला इंग्लडच्या वातावरणाशी जुळवून घेतले- गावसकर

लिटल मास्टर गावसकर पुढे म्हणाले, “सर्व भारतीय खेळाडूंमध्ये फक्त अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा हाच एकमेव फलंदाज कसोटी फॉरमॅटसाठी बनवला जातो का? कारण तो काउंटी क्रिकेट खेळत असतो.” असा उद्विग्न प्रश्न त्यांनी केला. गावसकर म्हणाले, “भारताकडे फक्त चेतेश्वर पुजारा आहे, जो इंग्लिश काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळत आहे, त्यामुळे तोच एकमेव खेळाडू असेल जो या परिस्थितीत दीर्घकाळ खेळत होता. अशा स्थितीत इतर खेळाडूंसमोर हे मोठे आव्हान असणार आहे.”

हेही वाचा: IPL 2023: “धोनी हा खूप चलाख असून जडेजाला…” सामन्यानंतर माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांचे मोठे विधान

WTC फायनलमध्ये रहाणे आपली ताकद दाखवेल का?

खराब फॉर्मनंतर अजिंक्य रहाणेने आयपीएलमध्ये जोरदार पुनरागमन केले आणि आयपीएलच्या या हंगामात चेन्नई सुपर किंग्जला विजेतेपद पटकावण्यास मदत केली. त्याच्याबाबत गावसकर म्हणाले की, “रहाणेचा इंग्लिश परिस्थितीत अनुभव संघासाठी फायदेशीर ठरेल. त्याला इंग्लंडमध्ये खेळण्याचा अनुभव असून त्याने इंग्लंडमध्ये खूप धावा केल्या आहेत. पाचव्या क्रमांकावर तो भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू असल्याचे मला वाटते. अजूनही मला वाटते की त्याच्यामध्ये बरेच क्रिकेट शिल्लक आहे आणि ही चांगली संधी असेल.”