माजी पाकिस्तानी खेळाडू आणि सध्याचे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (पोसिबी) चे अध्यक्ष रमीज राजा यांनी बाबर आझमबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला होता की, “पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने त्यांच्यात झालेल्या संभाषणादरम्यान दबावाबद्दल एक भाष्य केले होते, ज्याची टीका तो काही काळापासून करत आहे.” या प्रकरणावर पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने बाबर आझमला या सर्व गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी स्वतःवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

समा न्यूज चॅनेलवर बोलत असताना रमीज राजा म्हणाले होते, बाबर मला अनेकदा सांगतो, ‘बघा आमच्यावर किती टीका होते. मी त्याला या विषयावर म्हणालो, ‘आनंदी राहा, पाकिस्तानमधील क्रिकेट हा इतर खेळासारखा नाही जिथे लोक त्याची पर्वा करत नाहीत. एक फलंदाज म्हणूनही त्याच्यावर दबाव आहे.”

तुझ्यावर असा कोणता दबाव आहे

समा टीव्हीवर बोलताना शाहिद आफ्रिदी म्हणाला की, “बाबर आझम कोणता दबाव घेत आहे?” बाबरबद्दल बोलताना तो म्हणाले, “हा काय दबाव आहे? इतक्या धावांच्या मागे काय दडपण आहे? मलाही कळत नाही. हो वेळ लागतोय, पण बाबरला कोणत्याही प्रकारचे दडपण घेण्याची गरज वाटत नाही. त्याने केलेल्या अनेक उत्तम खेळी या देशासाठी खूप महत्त्वाच्या ठरल्या आहेत. नेहमीच तो पाकिस्तान संघात पहिल्या १,२ किंवा ३ अशा क्रमांकावर खेळला आहे. तो सर्वोतम फलंदाजांपैकी एक असून त्याने केलेली कामगिरी ही वाखाणण्याजोगी आहे. तो दबाव घेत असेल तर स्वत:ला मानसिकरित्या कमजोर करत आहे. त्याने दडपण घेऊ नये आणि त्याचे शॉट्स थांबवू नयेत. उत्तम फटकेबाजी करत राहावी.”

हेही वाचा :  Women’s T20 Asia Cup: शफालीची चमकदार कामगिरी! उपांत्य फेरीत थायलंडवर ७४ धावांनी दणदणीत विजय मिळवत टीम इंडिया फायनलमध्ये 

टी२० क्रिकेटला मध्यभागी ठेवत रिझवान आणि बाबर या दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीबद्दल बोलताना आफ्रिदी म्हणाला, “त्याचा जोडीदार रिझवानही चांगला आहे. जर तुम्ही असा विचार करत असाल की समोरच्याने धावा काढल्या आहेत आणि मी थोडा वेळ घेतो, तर ती नकारात्मक विचारसरणी आहे. आम्हाला दोन्ही फलंदाजांकडून षटकार नको आहेत. जर क्रिकेटचे शॉट्स ३६ चेंडूत खेळले तर ५०-५५ धावा त्याच पद्धतीने बनतील.”