IND U-19 vs SA U-19 1st Youth ODI: भारतीय अंडर-१९ संघाला काही दिवसांपूर्वी झालेल्या अंडर-१९ आशिया चषकातील अंतिम सामन्यात पाकिस्तानकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. आता भारतीय संघ येत्या १५ जानेवारीपासून अंडर-१९ वर्ल्डकप खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेसाठी आयुष म्हात्रेची भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेला सुरूवात होण्याआधी भारतीय संघ दक्षिण आफ्रिकेविरूद्ध ३ युथ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी वैभव सूर्यवंशीची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान या मालिकेतील सामने केव्हा, कुठे आणि कधी खेळवले जाणार? जाणून घ्या.
आयसीसी अंडर-१९ वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचे आयोजन झिम्बाब्वे आणि नामिबियामध्ये केले जाणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना १५ जानेवारीला, तर स्पर्धेतील अंतिम सामना ६ फेब्रुवारीला खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण १६ संघ सहभाग घेणार आहेत. या १६ संघांना ४ गटात विभागण्यात आलं आहे. त्यानंतर सुपर ६ फेरीतील सामने, सेमीफायनल आणि फायनलचा सामना होणार आहे.
आयुष म्हात्रे बाहेर
भारतीय अंडर-१९ संघाचा कर्णधार आयुष म्हात्रेला दक्षिण आफ्रिकेविरूद्ध होणाऱ्या युथ वनडे मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेलं नाही. आयुष आणि संघाचा उपकर्णधार विहान मल्होत्रा हे दोघेही दुखापतग्रस्त आहेत. त्यामुळे या संघाची जबाबदारी वैभव सूर्यवंशीकडे सोपवण्यात आली आहे. वैभव पहिल्यांदाच भारतीय अंडर-१९ संघाचं नेतृत्व करणार आहे.
भारत- दक्षिण आफ्रिका पहिला युथ वनडे सामना केव्हा होणार आहे?
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला युथ वनडे सामना ३ जानेवारी २०२६ रोजी बेनोनी येथील विलोमूर पार्क मैदानावर खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या युथ वनडे सामन्याचे नाणेफेक किती वाजता होईल?
या सामन्याचे नाणेफेक भारतीय वेळेनुसार दुपारी १ वाजता होईल.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला युथ वनडे सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
हा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार, याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
वैभव सूर्यवंशी (कर्णधार), एरॉन जॉर्ज (उपकर्णधार) वेदांत त्रिवेदी, अभिज्ञान कुंडु (यष्टिरक्षक) हरवंश सिंग(विकेटकीपर), आरएस अंबरीश , डी. दीपेश, किश कुमार सिंग, उधव मोहन, युवराज गोहिल , कनिष्क चौहान, खिलान ए. पटेल ,मोहम्मद एनान, हेनिल पटेल, राहुल कुमार,
