India vs Afghanistan 1st T20I Match Timings And Live Streaming: भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. या मालिकेचं आयोजन भारतात केलं गेलं असलं तरीदेखील, भारतीय संघ पाहूणा संघ असणार आहे. तर अफगाणिस्तानचा संघ यजमान असणार आहे. या मालिकेतील पहिला टी-२० सामना रविवारी १३ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. दरम्यान हा सामना किती वाजता सुरू होणार? आणि लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

भारत आणि अफगाणिस्तानातील पहिला टी-२० सामना किती वाजता सुरू होणार?

भारतात टी-२० मालिकेचे आयोजन केले जाणार म्हणजे, सामने संध्याकाळच्या वेळी होणार यात काहीच शंका नाही. हे सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत. तर नाणेफेक अर्ध्या तासाआधी म्हणजेच ६:३० वाजता होणार आहे. जर २०-० षटकांचा पूर्ण खेळ झाला, तर रात्री १० पर्यंत सामन्याचा निकालही लागेल. अफगाणिस्तानने आयसीसीच्या गेल्या काही स्पर्धांमध्ये दमदार कामगिरी केली आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते.

मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार?

या मालिकेच्या प्रसारणाचे मालकी हक्क सोनी स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. जर तुम्हाला हा सामना टीव्हीवर लाईव्ह पाहायचा असेल, तर तुम्ही सोनी स्पोर्ट्सव लाईव्ह पाहू शकता. पण जर मोबाईलवर पाहायचा असेल, तर तुम्ही सामना फॅनकोडवर लाईव्ह पाहू शकता. त्यामुळे तुम्हाला सामना सोनी स्पोर्ट्स किंवा हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येणार नाही.

येत्या काही दिवसांत भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. त्याआधी होणारी भारत आणि अफगाणिस्तान टी-२० मालिका दोन्ही संघांसाठी सराव मालिका असणार आहे. अफगाणिस्तानचा संघ या मालिकेची तयारी करण्यासाठी आधीपासूनच दिल्लीत आहे. तर भारतीय संघातील खेळाडू आता दिल्लीत दाखल झाले असून सरावाला सुरूवात केली आहे.

या मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि यश ठाकुर.

या मालिकेसाठी असा आहे अफगाणिस्तानचा संघ:

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नायब, नूर रहमान, मोहम्मद नबी, राशिद खान, फजलहक फारूकी, नवीन-उल-हक, नांग्याल खरोटी, मुजीब उर-रहमान, नूर अहमद, अब्दुल्ला अहमदजई