India vs Afghanistan T20 Series Live Streaming Details: आयपीएल २०२६ स्पर्धा झाल्यानंतर अफगाणिस्तानचा संघ कसोटी आणि वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारत दौऱ्यावर आला होता. आता अफगाणिस्तानचा संघ पुन्हा एकदा भारताविरुद्ध भारतात टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पण मुख्य बाब म्हणजे, भारतात टी-२० मालिका होत असूनही अफगाणिस्तान यनमानपद भूषवणार आहे. बीसीसीआयकडून या मालिकेच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान ही मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.
भारत आणि अफगाणिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारी ३ टी-२० सामन्यांची मालिका दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. या मालिकेची सुरुवात १३ सप्टेंबरपासून होणार आहे. मालिकेतील दुसरा सामना १५ सप्टेंबरला, तर मालिकेतील तिसरा सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. बीसीसीआयकडून भारत- अफगाणिस्तान टी-२० मालिकेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. याच महिन्यात भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये मर्यादीत षटकांची मालिका होणार अशी चर्चा रंगली होती. १ ते १३ सप्टेंबरदरम्यान बांगलादेश क्रिकेट बोर्डने ६ मर्यादीत षटकांच्या सामन्यांचे आयोजन केले होते. पण बांगलादेशने क्रिकेट बोर्डाने ठरवलेल्या तारखा आणि बीसीसीआयने जाहीर केलेल्या भारत – अफगाणिस्तान मालिकेच्या तारखा या जवळपास सारख्याच आहेत. यावरुन स्पष्ट होतंय की, भारतीय संघ मर्यादीत षटकांची मालिका खेळण्यासाठी बांगलादेश दौऱ्यावर जाणार नाही.
भारत- अफगाणिस्तान टी-२० मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार?
अफगाणिस्तानचा संघ भारतातच भारतीय संघाचा पाहुणचार करणार आहे. दोन्ही संघ ४ दिवसांत ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील सामने जिओ हॉटस्टार किंवा मग सोनी लिव्हवर लाईव्ह पाहता येणार नाहीत. तर तुम्हाला हे सामने लाईव्ह पाहायचे असतील, तर तुमच्याकडे फॅनकोड अॅपचं सब्स्क्रिप्शन असणं गरजेचं असणार आहे. कारण या मालिकेतील सामने फॅनकोडवर लाईव्ह पाहता येणार आहेत.
भारत आणि अफगाणिस्तान टी-२० मालिकेचं वेळापत्रक
१३ सप्टेंबर – भारत वि. अफगाणिस्तान – दिल्ली
१५ सप्टेंबर – भारत वि. अफगाणिस्तान – दिल्ली
१७ सप्टेंबर – भारत वि. अफगाणस्तान – दिल्ली
