India vs England 1st ODI Match Timing: भारताचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाला ४-० ने दारूण पराभवाचा सामना करावा लागला आहे. टी-२० मालिकेतील पराभव विसरून आता भारतीय संघ ३ वनडे सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाचा चेहरामोहरा बदलणार आहे. कारण रोहित शर्मा, विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहसारखे अनुभवी खेळाडू या मालिकेतून पुनरागमन करताना दिसून येणार आहेत. दरम्यान ही मालिका कधी सुरू होणार? आणि हे सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेची सुरुवात १३ जुलैपासून होणार आहे. या मालिकेत इंग्लंडच्या नेतृत्वाची जबाबदारी ही हॅरी ब्रूककडेच असणार आहे. तर भारतीय वनडे संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी शुबमन गिलकडे असणार आहे. तर उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरकडे असणार आहे. दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. कारण भारतीय संघात अनुभवी खेळाडू आहेत. तर दुसरीकडे इंग्लंडचा संघ टी-२० मालिकेत ४-० ने विजय मिळवून मैदानात उतरणार आहे.

भारत – इंग्लंड वनडे मालिकेचं वेळापत्रक

भारत विरुद्ध इंग्लंड – पहिला वनडे सामना : १३ जुलै

भारत विरुद्ध इंग्लंड – दुसरा वनडे सामना : १६ जुलै

भारत विरुद्ध इंग्लंड – तिसरा वनडे सामना: १९ जुलै

भारत – इंग्लंड पहिला वनडे सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० सामने संध्याकाळी ७ वाजता आणि रात्री १० वाजता सुरू झाले होते. आता वनडे मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार दुपारी ३:३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना बर्मिंगहॅमच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. ही मालिका सोनी स्पोर्ट्स नेटवर्क आणि जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येईल.

या मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यांश शेडगे, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, केएल राहुल, इशान किशन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, गुरनूर ब्रार, प्रिन्स यादव.