India vs Hong Kong Live Streaming Details: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ सध्या दुबईत सुरू असलेली महिला एशिया कप २०२६ स्पर्धा खेळण्यात व्यस्त आहे. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने थायलंडवर ९४ धावांनी एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाचा सामना हाँगकाँग संघाविरुद्ध होणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ आपली गुणतालिकेतील स्थिती आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान हा सामना लाईव्ह कुठे आणि किती वाजता पाहता येणार? जाणून घ्या.

भारत – हाँगकाँग सामना कधी खेळवला जाईल?

भारत – हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना आज (३ सप्टेंबर) खेळवला जाणार आहे.

भारत – हाँगकाँग यांच्यात होणारा सामना कुठे खेळवला जाणार आहे?

भारत आणि हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

भारत – हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना किती वाजता सुरू होईल?

या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ७:३० वाजता होईल.

भारत – हाँगकाँग सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना सोनी स्पोर्ट्स टेन १, सोनी स्पोर्ट्स टेन ३ आणि सोनी स्पोर्ट्स टेन ४ वर लाईव्ह पाहू शकता.

भारत – हाँगकाँग सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

भारत – हाँगकाँग या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही सोनी लिव्ह अॅपवर लाईव्ह पाहू शकता.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय महिला संघ:

भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, श्री चरणी, नंदनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, प्रतिका रावल, राधा यादव, गुणालन कमलिनी, प्रेमा रावत.