India vs New Zealand 1st ODI Time And Live Streaming Details: भारतीय संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने दमदार विजय मिळवला. टी-२० मालिकेवर कब्जा केल्यानंतर भारतीय संघ आता वनडे मालिका जिंकण्यासाठी मैदानात उतरणार आहे. टी-२० मालिकेतील सुरूवातीचे ३ सामने गमावल्यानंतर शेवटच्या २ सामन्यांमध्ये न्यूझीलंडमध्ये दमदार पुनरागमन केलं. त्यामुळे वनडे मालिकेत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळू शकते. दरम्यान वनडे मालिकेतील पहिला सामना केव्हा, कुठे आणि किती वाजता सुरू होणार? जाणून घ्या.
भारतीय संघ वनडेत आणखी ताकदीने मैदानात उतरणार आहे. कारण वनडेतील किंग विराट कोहली आणि रोहित शर्मा संघात परतले आहेत. तसेच कर्णधार शुबमन गिल देखील तुफान फॉर्ममध्ये आहे. तर दुसरीकडे न्यूझीलंडचं टेन्शन वाढलं आहे. कारण संघातील प्रमुख फलंदाज डेवॉन कॉन्व्हे दुखापतग्रस्त झाला आहे. त्यामुळे तो पहिल्या सामन्यातून बाहेर झाला आहे. तसेच मार्क चॅपमन आणि रचिन रवींद्र आधीपासूनच मालिकेतून बाहेर झाले आहेत.
भारत- न्यूझीलंड पहिला वनडे सामना कधी खेळवला जाणार?
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला वनडे सामना बुधवारी ४ नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.
भारत- न्यूझीलंड पहिला वनडे सामना कुठे खेळवला जाणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला वनडे सामना ऑकलँडच्या ईडन पार्कच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारत- न्यूझीलंड पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला वनडे सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ७ सकाळी ७ वाजता होईल.
भारत- न्यूझीलंड पहिला वनडे सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता.
भारत- न्यूझीलंड पहिला वनडे सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही सोनी लिव अॅपवर पाहू शकता.
वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:
सुरूवातीच्या ३ वनडे सामन्यांसाठी- शुभमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उपकर्णधार), केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, अंशुल कंबोज, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, ईशान किशन (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, आकिब नबी आणि कुलदीप यादव.
चौथ्या आणि पाचव्या वनडेसाठी असा आहे संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, तिलक वर्मा, ईशान किशन (यष्टीरक्षक आणि उपकर्णधार), नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, नमन धीर, आकिब नबी, गुरनूर ब्रार, ऋतुराज गायकवाड, अर्शदीप सिंग, कुमार कुशाग्र (यष्टीरक्षक), मोहम्मद सिराज, यश ठाकूर आणि कुलदीप यादव
