India vs New Zealand Final: भारतीय संघ इतिहास घडवण्याच्या उंबरठ्यावर आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये प्रवेश केला आहे. याआधी कुठल्याही यजमान देशाला टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावता आलेली नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे इतिहास घडवण्याची संधी असणार आहे. या स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी २५४ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडने २४६ धावांपर्यंत मजल मारली. भारताने हा सामना अवघ्या ६ धावांनी जिंकून फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता फायनलमध्ये भारताचा सामना न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. दरम्यान फायनल केव्हा, कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.

भारत- न्यूझीलंड फायनल सामना केव्हा होणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना रविवारी ८ मार्चला खेळवला जाणार आहे.

भारत- न्यूझीलंड फायनल सामना कुठे खेळवला जाणार आहे?
भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये होणारा फायनलचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत- न्यूझीलंड फायनल सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा फायनलचा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ६:३० वाजता होईल.

भारत- न्यूझीलंड फायनल सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणारा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता.

भारत- न्यूझीलंड फायनल सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
भारत- न्यूझीलंड फायनल सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

भारताचा दमदार विजय

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने २० षटकांअखेर २५३ धावांचा डोंगर उभारला. भारतीय संघाकडून फलंदाजी करताना संजू सॅमसनने ८९ धावांची खेळी केली. तर शिवम दुबेने ४३ धावांची खेळी केली. तर इशान किशनने ३९ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडच्या फलंदाजांनीही पूर्ण जोर लावला. जेकब बेथलने १०५ धावांची खेळी केली. तर विल जॅक्सने ३५ आणि जोस बटलरने २५ धावा केल्या. इंग्लंडने हा सामना अवघ्या ७ धावांनी गमावला.