India vs Pakistan Match Details: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन संयुक्तरित्या भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. भारतीय संघाने २०२४ मध्ये झालेल्या टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान मिळवला होता. यावेळी भारतीय संघ तुफान फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान भारत – पाकिस्तान सामना या स्पर्धेचं मुख्य आकर्षण असणार आहे. दरम्यान भारत – पाकिस्तान सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.

भारत आणि पाकिस्तान दोन्ही संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बलाढ्य संघांपैकी एक आहे. दोन्ही संघ जेव्हा आमनेसामने येतात तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळत असतो. गेल्यावेळी हे दोन्ही संघ आशिया चषक २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यात आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध खेळताना भारतीय संघाचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. यावेळी भारतीय संघ हा रेकॉर्ड आणखी मजबूत करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

भारत – पाकिस्तान सामना केव्हा होणार आहे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना १५ फेब्रुवारीला खेळवला जाणार आहे.

भारत – पाकिस्तान सामना कुठे खेळवला जाणार आहे?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना श्रीलंकेतील आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

भारत – पाकिस्तान यांच्यात होणारा सामना किती वाजता सुरू होईल?
भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होईल.

भारत – पाकिस्तान सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर लाईव्ह पाहता येणार आहे. या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक).