India vs Srilanka , U19 Asia Cup Semi Final: भारताचा युवा फलंदाज आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ आणखी एक मोठी स्पर्धा जिंकण्याच्या उंबरठ्यावर आहे. भारतीय संघाने दुबईत सुरू असलेल्या अंडर १९ एशिया कप २०२५ स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. दरम्यान हा सामना केव्हा, कधी आणि कुठे खेळवला जाणार? आणि लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती.

अंडर १९ एशिया कप स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये प्रवेश करणारे ४ संघ ठरले

अंडर १९ एशिया कप स्पर्धेतील साखळी फेरीतील सामने समाप्त झाले आहेत. आता बाद फेरीतील सामन्यांना सुरूवात होणार आहे. भारत आणि पाकिस्तानसह बांगलादेश आणि श्रीलंका या संघांनी सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. भारतीय संघाचा सेमीफायनलचा सामना श्रीलंकेविरूद्ध होणार आहे. तर दुसरीकडे पाकिस्तानचा सामना बांगलादेशविरूद्ध खेळवला जाणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ आशिया चषक स्पर्धेतील अंतिम सामना खेळण्यासाठी आमनेसामने येऊ शकतात.

किती वाजता सुरू होणार सामना?

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला सेमीफायनलचा सामना १९ डिसेंबरला खेळवला जाणार आहे. हा सामना दुबईतील आयसीसी अॅकेडमीच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. तर बांगलादेश आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये दुसऱ्या सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. हा सामना दुबईतील द सेवन स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे. हे दोन्ही सामने एकाच वेळी खेळवले जाणार आहेत. हा सामना सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहे. तर दहा वाजता टॉस होणार आहे. ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये खेळवली जात आहे. त्यामुळे संध्याकाळपर्यंत फायनलमध्ये जाणाऱ्या संघांचा निकाल लागेल.

लाईव्ह कुठे पाहता येणार?

आशिया चषक स्पर्धेतील सेमीफायनलचा थरार तुम्ही सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. जर तुम्ही हा सामना टीव्हीवर पाहत असाल, तर तुम्हाला हा सामना सोनी स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल. तर मोबाईलवर लाईव्ह पाहायचा असेल, तर त्यासाठी तुमच्याकडे सोनी लिव्ह अॅपचं सब्स्क्रिप्शन असणं गरजेचं असणार आहे. शुक्रवारी फायनलमध्ये जाणारे २ संघ कोणते असतील हे समजल्यानंतर रविवारी फायनलचा थरार रंगणार आहे.