India vs West Indies 1st T20I Live Streaming Details: आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा एकतर्फी खेळ पाहायला मिळाला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने फायनलमध्ये पाकिस्तानला पराभूत केलं आणि गोल्ड मेडल पटकावलं. ही स्पर्धा सुरू असतानाच भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांची मालिका सुरू होती. या मालिकेत शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने २-१ ने विजयाची नोंद केली. आता भारतीय संघ ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान या मालिकेतील पहिला टी-२० सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? हा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना केव्हा खेळवला जाणार आहे?

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये होणारा पहिला टी-२० सामना ६ ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना कुठे खेळवला जाणार आहे?

हा सामना लखनौच्या इकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना किती वाजता सुरू होणार?

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये होणारा स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे.

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला टी-२० सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील मालिकेचे सामने हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.

वनडे मालिकेत भारतीय संघाचा विजय..

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पार पडलेल्या वनडे मालिकेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या दुसऱ्या वनडे सामन्यातही भारतीय संघाने ८ गडी राखून विजय मिळवला. पण तिसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने दमदार पुनरागमन केलं. वेस्ट इंडिजने हा सामना ५ गडी राखून आपल्या नावावर केला. पण भारतीय संघाने ही मालिका २-१ ने आपल्या नावावर केली.