IND vs WI Match Details: भारतीय संघासाठी आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील सेमी फायनलमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात भारतीय संघाने झिम्बाब्वेसमोर विजयासाठी २५७ धावांचे मोठे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह झिम्बाब्वेने हा सामना ७२ धावांनी गमावला. दरम्यान भारतीय संघाचा पुढील सामना केव्हा, कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या.
भारतीय संघ सुपर ८ फेरीत आपला शेवटचा सामना वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे. जो संघ हा सामना जिंकेल तो थेट सेमी फायनलमध्ये प्रवेश करणार आहे.
भारत – वेस्ट इंडिज सामना कधी होणार?
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना रविवारी १ मार्चला खेळवला जाणार आहे.
भारत – वेस्ट इंडिज सामना कुठे होणार आहे?
भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारत – वेस्ट इंडिज सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात होणारा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होणार आहे.
भारत – वेस्ट इंडिज सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता.
भारत – वेस्ट इंडिज सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जिओ हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता.
भारताचा दमदार विजय
भारत आणि झिम्बाब्वे या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २५६ धावांचा डोंगर उभारला. ही टी-२० वर्ल्डकप स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. या धावांचा पाठलाग करताना झिम्बाब्वेला १८४ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह भारतीय संघाने हा सामना ७२ धावांनी आपल्या नावावर केला.
