India vs Pakistan, Womens Asia Cup 2026 Live Streaming: दुबईत सुरू असलेल्या महिला एशिया कप स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने साखळी फेरीतील दोन्ही सामन्यांमध्ये दमदार विजयाची नोंद केली आहे. हाँगकाँग आणि थायलंडला पराभूत केल्यानंतर ४ गुणांसह भारतीय संघाने सेमीफायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. आता भारतीय संघाचा पुढील सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरूद्ध होणार आहे. हे दोन्ही संघ जेव्हा जेव्हा आमनेसामने येतात, तेव्हा क्रिकेट चाहत्यांना हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळत असतो. दरम्यान हा सामना लाईव्ह कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या.
या स्पर्धसाठी भारतीय संघाचा ग्रुप ए मध्ये समावेश करण्यात आला आहे. या गटात भारतासह थायलंड, पाकिस्तान आणि हाँगकाँग या संघांचा देखील समावेश करण्यात आला आहे. भारतीय संघाने सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आता पाकिस्तानला पराभूत करून भारतीय संघ विजयाची हॅट्रिक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. महिलांच्या क्रिकेटमध्ये आतापर्यंत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाने पाकिस्तानविरुद्ध खेळताना एकही सामना गमावलेला नाही. भारतीय संघ हा रेकॉर्ड कायम ठेवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
भारत – पाकिस्तान सामना कधी खेळवला जाणार आहे?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा थरारक सामना शनिवारी ५ सप्टेंबरला खेळवला जाणार आहे.
भारत – पाकिस्तान सामना कुठे खेळवला जाणार आहे?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना दुबईतील दुबई क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवला जाणार आहे.
भारत – पाकिस्तान सामना किती वाजता सुरू होणार?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणारा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ७:३० वाजता होईल.
भारत – पाकिस्तान सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
हा सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्स १, सोनी स्पोर्ट्स ३ आणि सोनी स्पोर्ट्स टेन ४ वर लाईव्ह पाहू शकता.
भारत – पाकिस्तान सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही सोनी लिव अॅपवर लाईव्ह पाहू शकता.
या स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:
भारतीय महिला संघ: स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), भारती फुलमाळी, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (यष्टीरक्षक), अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, श्री चरणी, नंदनी शर्मा, रेणुका सिंग ठाकूर, प्रतिका रावल, राधा यादव, गुणालन कमलिनी, प्रेमा रावत.
