India-W vs Zimbabwe-W Live Streaming: भारतीय महिला संघाने काही दिवसांपूर्वीच हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली खेळताना आशियाई क्रीडा स्पर्धेत गोल्ड मेडल पटकावलं. आता भारतीय महिला संघ नव्या आव्हानासाठी सज्ज झाला आहे. हरमनप्रीत कौरने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे स्मृती मानधना पहिल्यांदाच पूर्णवेळ कर्णधार म्हणून मैदानात उतरणार आहे. भारतीय संघ पहिल्यांदाच झिम्बाब्वेचा सामना करणार आहे झिम्बाब्वेचा संघ भारत दौऱ्यावर आला असून दोन्ही संघांमध्ये ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. दरम्यान मालिकेतील पहिला सामना केव्हा आणि कुठे खेळवला जाणार? यासह सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

येत्या काही दिवसांत भारतीय संघ पहिल्यांदाच होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसून येणार आहे. ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील पहिला टी-२० सामना रायपुरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमध्ये खेळवला जाणार आहे. मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबर, दुसरा सामना १८ ऑक्टोबर आणि मालिकेतील शेवटचा सामना २० ऑक्टोबरला खेळवला जाणार आहे. या मालिकेतील सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत. तर नाणेफेक संध्याकाळी ६:३० वाजता होईल.

या मालिकेतील सामने लाईव्ह कुठे पाहता येणार?

या मालिकेतील सामने तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता. तसेच या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर लाईव्ह पाहू शकता. यासह या सामन्याचे अपडेट्स तुम्ही http://www.loksatta.com वर मिळवू शकता.

भारत – झिम्बाब्वे टी-२० मालिकेसाठी असे आहेत दोन्ही संघ:

भारतीय महिला संघ – शफाली वर्मा, स्मृती मानधना (कर्णधार), हरमनप्रीत कौर, ऋचा घोष (यष्टिरक्षक), जी कमलिनी, दीप्ती शर्मा, अरुंधती रेड्डी, मिन्नू मणि, श्री चरणी, नंदिनी शर्मा, क्रांति गौड़, अनुष्का शर्मा, जिन्तिमणि कलिता, निकी प्रसाद आणि प्रेमा रावत.

जिम्बाब्वे महिला संघ – केलिस नधलोवु, बिलवेड बिजा, न्याशा ग्वानज़ुरा, जोसेफिन नकोमो (कर्णधार), मोडेस्टर मुपाचिक्वा, शार्ने मेयर्स, लोरिन फिरी, फ्रांसिस्का चिपारे, कुडजई चिगोरा, नोमवेलो सिबांडा, ओलिन्दर चारे, मिशेल मावुंगा, तेंडाई मकुशा, चिपो मुगेरी-तिरिपानो, चिएद्ज़ा धुरुरू (यष्टिरक्षक)