Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad: आयपीएल २०२६ स्पर्धेचा रणसंग्राम आजपासून सुरू होणार आहे. क्रिकेट चाहते या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्याने या स्पर्धेची सुरुवात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने गेल्या हंगामात दमदार कामगिरी केली होती. यासह १८ वर्षांनंतर पहिल्यांदाच जेतेपदाचा मान पटकावला होता. त्यामुळे रजत पाटीदारच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ जेतेपद राखण्याच्या हेतूने मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे सनरायझर्स हैदराबादचा संघ देखील दमदार सुरुवात करण्याच्या प्रयत्नात असणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांमध्ये थरारक सामना पाहायला मिळणार यात काहीच शंका नाही. दरम्यान जाणून घ्या या सामन्याबद्दल सर्वकाही.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना केव्हा होणार आहे?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना आज (२८ मार्च) ला खेळवला जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामना कुठे खेळवला जाणार आहे?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना बंगळुरूतील एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना किती वाजता सुरू होणार आहे?
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक ७ वाजता होईल.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणारा सामना लाईव्ह कुठे पाहता येणार?
हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर विविध भाषेत लाईव्ह पाहू शकतात.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात होणाऱ्या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?
या सामन्याचे लाईव्ह स्ट्रिमिंग तुम्ही जियो हॉटस्टारवर आणि वेब साईटवर लाईव्ह पाहू शकता.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संपूर्ण संघ :
रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या, स्वप्नील सिंग, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जैकब बेथेल, जोश हॅजलवुड, यश दयाल, भुवनेश्वर कुमार, नुवान तुषारा, रसिख सलाम, अभिनंदन सिंह, सुयश शर्मा, व्यंकटेश अय्यर, जैकब डफी, सात्विक देसवाल, मंगेश यादव, जॉर्डन कॉक्स, विक्की ओस्टवाल विहान मल्होत्रा, कनिष्क चौहान
सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ
पॅट कमिन्स, ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा (उपकर्णधार), अनिकेत वर्मा, आर स्मरण, इशान किशन (कर्णधार), हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कार्स, जयदेव उनाडकट, इशान मलिंगा, झीशान अन्सारी, शिवांग कुमार, सलील अरोरा, शाकिब हुसैन, ओमकार तरमळे, अमित कुमार, प्रफुल्ल हिंगे, क्रेन्स फुलेरा, लियाम लिव्हिंगस्टोन, शिवम मावी, जॅक एडवर्ड्स
