Teams Who Played Most Test: भारतीय संघ सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. दोन्ही संघ २ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. मालिकेतील पहिला कसोटी सामना गॉलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार शुबमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना भारतीय संघासाठी ऐतिहासिक आहे. कारण स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी भारतीय संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ६०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. या ऐतिहासक सामन्यात नेतृत्व करण्याचा मान हा युवा खेळाडू शुबमन गिलला मिळाला आहे. दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे संघ कोणते? जाणून घ्या.

इंग्लंडचा संघ अव्वल स्थानी

कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळण्याचा रेकॉर्ड हा इंग्लंडच्या नावे आहे. क्रिकेट या खेळाची सुरुवात इंग्लंडमधून झाली होती. या संघाने आतापर्यंत १००० हून अधिक कसोटी सामने खेळले आहेत. १०९७ कसोटी सामन्यांसह इंग्लंडचा संघ या यादीत अव्वल स्थानी आहे. यादरम्यान इंग्लंडने ४०५ सामने जिंकले आहेत. तर ३३६ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर ३५६ सामने ड्रॉ झाले आहेत.

दुसऱ्या स्थानी कोण?

बांगलादेशचा संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील ८८३ वा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. ऑस्ट्रेलियाने इंग्लंडहून कमी सामने खेळले आहेत. पण ऑस्ट्रेलियाचा विजयाचा रेकॉर्ड हा इंग्लंडहून चांगला आहे. ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक ४२६ सामने खेळले आहेत. यापैकी २३५ सामने गमावले आहेत. तर २१९ सामने ड्रॉ झाले आहेत.

भारतीय संघ तिसऱ्या स्थानी

या यादीत भारतीय संघ तिसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघाचा हा ६०० वा आंतरराष्ट्रीय सामना आहे. भारतीय संघ ६०० वा कसोटी सामना खेळणारा तिसरा देश बनला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ५९९ सामने खेळले असून १८६ सामने जिंकले आहेत. तर १८८ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करवा लागला आहे. यादरम्यान २२४ सामने ड्रॉ राहिले आहेत.

सर्वाधिक कसोटी सामने खेळणारे संघ कोणते?

इंग्लंड -१०९७
ऑस्ट्रेलिया – ८८३
वेस्ट इंडिज – ५९६
न्यूझीलंड – ४८७
दक्षिण आफ्रिका – ४७९
पाकिस्तान – ४७१
श्रीलंका – ३२९