भारतीय संंघात एकापेक्षा भन्नाट खेळाडू आहेत. क्रिकेटच्या मैदानावर आणि क्रिकेट मैदानाबाहेर खेळाडू तितकेच चर्चेचा विषय असतात. टीम इंडियाचा सलामीवीर यशस्वी जैस्वालने नुकत्याच एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमामध्ये त्याने संघातील खेळाडूंना चित्रपटांची नाव दिली आहे. यशस्वीच्या उत्तरांपैकी त्याने बाहुबली हे नाव ज्या खेळाडूला दिलं ते पाहून सर्वच जण चकित झाले.

यशस्वीने अजेंडा आज तक या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती. या कार्यक्रमात बोलताना त्याने रोहित शर्मा, विराट कोहली भारतीय संघ अशा विषयांवर चर्चा केली. यामध्ये रॅपिड फायर राऊंडमध्ये यशस्वीला काही चित्रपटांची नाव देण्यात आली आणि या चित्रपटाचं नाव ऐकल्यानंतर कोणत्या खेळाडूचं नाव समोर येतं हे सांगायला त्याला सांगितलं.

यशस्वी जैस्वालला कोणकोणत्या चित्रपटांची नाव विचारण्यात आली, जाणून घेऊया.

प्रश्न – टीम इंडियातील धुरंधर कोण आहे?
उत्तर – रोहित शर्मा

बाहुबली
उत्तर – युझवेंद्र चहल,

सय्यारा, म्हणजे तारा
उत्तर – विराट कोहली

दबंग
उत्तर – हार्दिक पंड्या

दिलदार
उत्तर – विराट कोहली, केएल राहुल</p>

या प्रश्नांव्यतिरिक्त, यशस्वी जैस्वालला पुढचा प्रश्न विचारण्यात आला: “ये जवानी है दिवानी” चित्रपटाचे शीर्षक कोणाला द्यायचे असेल, तर ते कोणाला द्यायला आवडेल? बराच विचार केल्यानंतर, यशस्वीने उत्तर दिले, “सध्या, माझीच जवानी सुरू आहे.” म्हणजेच संघात तरूण खेळाडू तोच आहे. अखेर, यशस्वी जैस्वालने टीम इंडियाच्या सर्वात मोठ्या आळशी खेळाडूचे नाव उघड केलं. तो म्हणाला की सध्याच्या संघात कुलदीप यादव हेच नाव आहे.

यानंतर, यशस्वीला विचारण्यात आलं की भारतीय क्रिकेट संघातील सर्वात मेहनती व्यक्ती कोण आहे, ज्यावर यशस्वीने उत्तर दिलं की मला वाटतं शुबमन गिल आहे कारण मी त्याला पाहिलं आहे, त्याने खूप मेहनत केली आहे. तो फिटनेस व त्याच्या संपूर्ण रूटीनवर खूप लक्ष देतो.