Who is Arshdeep Singh Rumoured GF: भारताचा यशस्वी टी-२० गोलंदाज असलेला अर्शदीप सिंग सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. मूळचा पंजाबचा असलेला अर्शदीप आयपीएललमध्येही पंजाब किंग्सकडून खेळत आहे. अर्शदीप सिंग सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. इन्स्टाग्रामवरील त्याचे रील्स तर व्हायरल होतात. याशिवाय अर्शदीप सिंग स्नॅपचॅटवर देखील सक्रिय असतो. या स्नॅपचॅटवर त्याने शेअर केलेल्या एका फोटोमुळे त्याच्या गर्लफ्रेंडची आता चर्चा रंगली आहे.
अर्शदीप सिंगने त्याच्या स्नॅपचॅट अकाउंटवर एका अनोळखी मुलीसोबत हात धरलेली एक स्टोरी शेअर केली. चाहत्यांच्या नजरेस हा फोटो येताच सर्वांनी लगेच तपास सुरू झाला. दरम्यान अर्शदीप सिंगच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचं नावदेखील चाहत्यांनी शोधून काढलं आहे. अर्शदीप सिंगची रूमर्ड गर्लफ्रेंड मॉडेल आणि अभिनेत्री आहे.
कोण आहे समरीन कौर? अर्शदीपची रूमर्ड गर्लफ्रेंड असल्याची चर्चा
अर्शदीप सिंगच्या रूमर्ड गर्लफ्रेंडचं नाव समरीन कौर असल्याचं म्हटलं जात आहे. ती एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. तिचे इन्स्टाग्रामवर चाळीस लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. इतकंच नाही तर, तिने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये मुल्लानपूरमधील एका सामन्यातील फोटोही शेअर केला आहे. या फोटोमध्ये समरीनने पंजाब किंग्सची जर्सी घातलेली दिसत आहे. या फोटोमुळेही तीच अर्शदीप सिंगची रूमर्ड गर्लफ्रेंड असल्याच्या चर्चांना अधिक उधाण आलं.
आधी अर्शदीपने एका मुलीच्या नखांचा फोटो शेअर केला. त्यानंतर, त्याने स्नॅपवर एका मुलीचा हात धरलेला स्वतःचा एक फोटो शेअर केला. यानंतर चाहत्यांनी समरीनच्या नखांवर त्याच रंगाचे आणि डिझाइनचे नेल आर्ट असल्याचा फोटो शेअर केला. याव्यतिरिक्त, अर्शदीपने हात धरलेल्या स्नॅपमध्ये तिच्या हातावर एक टॅटू होता. समरीन कौरच्या हातावरही तसाच टॅटू आहे. समरीनने मुल्लानपूरमधील सामन्यातील एक फोटोही शेअर केला आहे.
समरीन कौर ही मूळची जम्मू काश्मीरची आहे. २६ वर्षीय समरीनने पुण्यातील सिम्बायोसिस कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्समधून आपलं शिक्षण पूर्ण केलं असून, ती आता एक मॉडेल आणि अभिनेत्री आहे. इतकंच नाही, तर समरीन २०१८ च्या मिस इंडिया स्पर्धेची अंतिम स्पर्धकही होती.
तिने अनेक हिंदी आणि पंजाबी म्युझिक व्हिडिओ आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिने रणवीर सिंगसोबत ‘८३’ मध्ये भूमिका साकारली होती. तसेच तिने ‘स्टुडंट ऑफ द इयर २’ मध्ये वंदना चावलाची भूमिका साकारली होती. समरीन ‘सरदार जी २’ आणि ‘नेल पॉलिश’ या पंजाबी चित्रपटांमध्येही दिसली आहे.
