Who Is Devdutt Padikkal Girlfriend Riyanjali Nanjappa: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये सुरू असलेल्या २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामनात गॉलच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या सामन्यात भारताचा युवा स्टार फलंदाज देवदत्त पडिक्कलला संधी देण्यात आली आहे. साई सुदर्शनच्या जागी मिळालेल्या संधीचं सोनं करत, देवदत्त पडिक्कलने पहिल्या डावात शतक झळकावलं, तर दुसऱ्या डावात तो अर्धशतकाच्या अगदी जवळ पोहोचला होता. या सामन्यात त्याने २०० हून अधिक धावा केल्या. दरम्यान मैदानातील कामगिरीमुळे चर्चेत आल्यानंतर त्याच्या वैयक्तिक आयुष्याची देखील जोरदार चर्चा रंगली आहे. त्याचं नाव रियांजली नानजप्पा सोबत जोडलं जात आहे. दरम्यान रियांजली नानजप्पा आहे तरी कोण? जाणून घ्या.
रियांजली नानजप्पा आहे तरी कोण?
सोशल मीडियावर देवदत्त पडिक्कल आणि रियांजली नानजप्पाचे काही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरुन देवदत्त पडिक्कलचं नाव रियांजली नानजप्पासोबत जोडलं जाऊ लागलं आहे. भारतीय संघाचा सामना गॉल येथे सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी रियांजली नानजप्पाने देखील हजेरी लावल्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटो व्हायरल होताच, रियांजली नानजप्पा कोण आहे? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. माध्यमातील वृत्तानुसार, रियांजली नानजप्पा ही पेशाने एक डिझायनर आणि पॉटरी आर्टिस्ट (मातीची कलाकृती आणि भांडी बनवणारी कलाकार) आहे.
सोशल मीडियावर चर्चा
सोशल मीडियावर दोघांचं रिलेशनशिप सुरु असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे. पण दोघांनीही याबाबत कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे देवदत्त पडिक्कल आणि रियांजली नानजप्पा हे दोघेही रिलेशनशिपमध्ये असल्याच्या केवळ चर्चा आहेत. या चर्चा सोशल मीडियावर होत असलेल्या व्हायरल पोस्टवरुन रंगल्या आहेत.
देवदत्त पडिक्कलची दमदार खेळी
भारताचा सर्वात विश्वासू फलंदाज चेतेश्वर पुजाराने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर, गेली बरेच वर्ष कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी विश्वासू फलंदाज नव्हता. या स्थानी फलंदाजी करण्यासाठी अनेक फलंदाजांना संधी दिली गेली. पण कुठलाही फलंदाज टिचून फलंदाजी करु शकला नव्हता. पण साई सुदर्शनच्या जागी मिळालेल्या पहिल्याच संधीचं सोनं करत देवदत्त पडिक्कलने दमदार शतक झळकावलं.
