scorecardresearch

WPL 2023 MI vs GG: कोण आहे १९ वर्षीय जिंतीमणी कलिता? जिच्यावर हरमनप्रीतने पहिल्याच सामन्यात दाखवला विश्वास

Mumbai Indians womens vs Gujarat Giants Women Match Updates: पहिल्याच सामन्यात हरमनप्रीत कौरने १९ वर्षीय जिंतीमणी कलितावर विश्वास दाखवला आहे. जिंतीमणीचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे.

WPL 2023, MI-W vs GG-W 1st Match Updates
मुंबई इंडियन्स संघ (फोटो- ट्विटर)

WPL 2023 1st Match MIW vs GGW: महिला प्रीमियर लीग २०२३ (WPL 2023) च्या हंगामाला मुंबईत सुरू झाली आहे. शनिवारी डीवाय पाटील स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि गुजरात जायंट्स यांच्यात पहिला सामना खेळवला जात आहे. या सामन्यात जायंट्सची कर्णधार बेथ मुनीने नाणेफेक जिंकून हरमनप्रीत कौरच्या संघ मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले, तर पहिल्याच सामन्यात हरमनने १९ वर्षीय जिंतीमणी कलिताचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करून विश्वास दाखवला. चला जाणून घेऊया कोण आहे जिंतीमणी कलिता.

जिंतिमणी कलिता तिच्या ७८ धावांच्या खेळीने प्रसिद्ध –

जिंतिमणी कलिता ही आसाम गुवाहाटी येथील रहिवासी आहे. ती उजव्या हाताची फलंदाज आणि मध्यम वेगवान गोलंदाज आहे. तिला लिलावात १० लाख रुपयांना विकत घेण्यात आले. जिंतीमणीला एका सामन्यातून मोठी ओळख मिळाली. खरेतर, वरिष्ठ महिला एकदिवसीय ट्रॉफीमध्ये आसामची ४ बाद ५६ अशी अवस्था झाली होती. त्यानंतर कलिताने ११४ चेंडूत शानदार ७८ धावा करून संघला २१४ धावांपर्यंत मजल मारुन दिली होती, जी मेघालयसाठी मोठी धावसंख्या ठरली.

आसाममधील एकमेव खेळाडू –

केवळ १९ वर्षांची कलिता ही डब्ल्यूपीएलमधील आसामची एकमेव खेळाडू आहे. सीम-बॉलिंग अष्टपैलू खेळाडूंसाठी मुंबईकडे काही पर्याय आहेत, परंतु कलिता ही एकमेव डावखुरी फलंदाज आहे. गेल्या वर्षी श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचा समावेश असलेल्या अंडर-१९ महिलांच्या मालिकेतही ती सहभागी झाली होती. यंगस्टर कलिता या टीममध्ये नॅट सिव्हर-ब्रंट, पूजा वस्त्राकर, इस्सी वोंग यांच्यासोबत खेळण्याचा अनुभव घेईल.

सामन्याबद्दल बोलायचे तर, मुंबई इंडियन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना पावरप्लेच्या षटकांनतर १ बाद ४४ धावा केल्या आहेत. नॅट सायव्हर-ब्रंट १८ आणि हेली मॅथ्यूज २३ धावांवर खेळत आहेत. यस्तिका भाटिया एका धावेवर बाद झाली. तिला तनुजा कनवरने बाद केले.

हेही वाचा – WPL 2023: महिला प्रीमियर लीगला धमाकेदार सुरुवात; ट्रॉफीचे अनावरणासह ‘हे’ सेलिब्रेटी थिरकले, पाहा VIDEO

गुजरात जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): बेथ मुनी (कर्णधार), सब्भिनेनी मेघना, हरलीन देओल, अॅशलेग गार्डनर, अॅनाबेल सदरलँड, दयालन हेमलता, जॉर्जिया वेरेहम, स्नेह राणा, तनुजा कंवर, मोनिका पटेल, मानसी जोशी

मुंबई इंडियन्स महिला (प्लेइंग इलेव्हन): हेली मॅथ्यूज, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षख), हरमनप्रीत कौर (कर्णधार), नॅट सायव्हर-ब्रंट, अमेलिया केर, अमनजोत कौर, पूजा वस्त्राकर, हुमैरा काझी, इस्सी वोंग, जिंतीमणी कलिता, सायका इशाक

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-03-2023 at 20:50 IST
ताज्या बातम्या