Who Is Lizelle Lee: महिला प्रीमियर लीग २०२६ स्पर्धेत बुधवारी झालेल्या सामन्यात यूपी वॉरियर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात गुजरात जायंट्सने पहिल्या डावात फलंदाजी करताना १५४ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्स संघाकडून धावांचा पाठलाग करताना लिजेल ली ने ४४ चेंडूंचा सामना करत ६७ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर तिने दिल्ली कॅपिटल्सला एकतर्फी विजय मिळवून दिला. दरम्यान लिजेल ली आहे तरी कोण? जाणून घ्या.
लिजेल ली ही दक्षिण आफ्रिकेची माजी फलंदाज आहे. ती अनेकदा डावाची सुरूवात करण्यासाठी मैदानात उतरली होती. २०२२ मध्ये तिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. २०१३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी लिजेल ली बांगलादेशविरूद्ध आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली होती. तिला दक्षिण आफ्रिकेकडून १८४ सामने खेळण्याची संधी मिळाली. तिला ८२ टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान तिने १८९६ धावा केल्या. तर वनडे क्रिकेटमध्ये तिने ३३१५ धावा केल्या. यादरम्यान तिने ३ शतक आणि २३ अर्धशतकं झळकावली. बांगलादेश आणि इंग्लंडविरूद्ध खेळताना तिने ५० च्या सरासरीने धावा केल्या.
सध्या ती महिला प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाकडून खेळताना दिसून येत आहे. ७६ किलो वजन असूनही तिने यष्टीमागे दमदार कामगिरी केली आहे. डाईव्ह मारून झेल पकडणं असेल किंवा वेगाने स्टंपिंग करायची असेल, या सर्व बाबतीत ती तरबेज आहे. गेल्या सामन्यात तिने उजव्या बाजूला डाईव्ह मारून भन्नाट झेल घेतला होता. यष्टीमागे दमदार कामगिरी केल्यानंतर आता तिने फलंदाजीतही तुफान फटकेबाजी केली आहे. यूपी वॉरियर्स संघाविरूद्ध खेळताना तिने ४४ चेंडूंचा सामना करत ८ चौकार आणि ३ षटकारांचा सामना करत ६७ धावांची खेळी केली.
या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेली किरण नवगिरे शून्यावर माघारी परतली. तर मेग लॅनिंगने ५४ धावांची खेळी केली. फिबी लिचफिल्डन २७ धावांची खेळी केली. हरलिन देओल ४७ धावा करून रिटायर्ड हर्ट होऊन माघारी परतली. तर श्वेता शेरावतने ११ धावा केल्या. या खेळीच्या बळावर यूपी वॉरियर्सने २० षटकांअखेर ८ गडी बाद १५४ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून शफाली वर्माने ३६ धावांची खेळी केली. तर लिजेल लीने ६७ धावांची खेळी केली. लॉराने नाबाद २५ आणि जेमिमाह रॉड्रिग्जने २१ धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सने हा सामना ७ गडी राखून आपल्या नावावर केला.
