Medhavi Bidhuri Viral Celebration Womens Delhi Premier League: सध्या भारताची एका महिला क्रिकेटपटू सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. महिलांच्या ‘दिल्ली प्रीमियर लीग २०२६’ च्या सलामीच्या सामन्यात, ‘साउथ दिल्ली सुपरस्टार्स्’ने ‘सेंट्रल दिल्ली क्वीन्स’ यांच्यातील सामन्यात गोलंदाज माधवी बिधुरीने विकेट घेताच केलेल्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ती चर्चेचा विषय ठरला. माधवी बिधुरी नेमकी कोण आहे, जाणून घेऊया.

साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघाने ‘सेंट्रल दिल्ली क्वीन्स संघासमोर समोर १५७ धावांचे लक्ष्य ठेवलं. याला प्रत्युत्तर देताना, ‘सेंट्रल दिल्ली क्वीन्स’ला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १२७ धावाच करता आल्या. मेधावीने आपल्या संघासाठी चार षटके गोलंदाजी करताना २४ धावांत दोन बळी घेतले. तिने निशिका सिंगला बाद करून सामन्यातील आपला दुसरा बळी मिळवला; ही विकेट घेतल्यानंतर तिने ज्या प्रकारे जल्लोष केला, तो लगेचच चर्चेचा विषय ठरला.

निशिका सिंगची विकेट घेतल्यानंतर मेधावीने नेहमीप्रमाणे जल्लोष न करता, आपले हात वर-खाली हलवत एक वेगळाच ‘६-७’ (6-7) असा जल्लोष केला. या जल्लोषाचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल झाला आणि मेधवी प्रकाशझोतात आली. तेव्हापासून ती सतत चर्चेत राहिली असून, तिच्या सामन्यांशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळत आहेत.

सामन्यानंतर मेधवीने या अनोख्या सेलिब्रेशनमागचे गुपित उघड केलं. तिने सांगितले की, तिला सुरुवातीला १२ क्रमांकाची जर्सी हवी होती, पण तो क्रमांक आधीच दुसऱ्या खेळाडूने घेतला होता. त्यानंतर तिच्या धाकट्या बहिणीने तिला ६७ हा क्रमांक निवडण्याची सूचना केली. मेधावीच्या म्हणण्यानुसार, तिची बहीण ‘जनरेशन-झेड’ (Gen-Z) मधील आहे आणि तिनेच तिला सांगितलं होतं की ‘६-७’ (6-7) हा क्रमांक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. त्यानंतर, मेधावीने ६७ हा जर्सी क्रमांक निवडला आणि विकेट घेतल्यानंतर त्या क्रमांकाशी संबंधित एक विशिष्ट सेलिब्रेशन करण्याचं ठरवलं. यानंतर तिच्या लुक्सवरून तिला नवी नॅशनल क्रश असंही काही नेटकरी म्हणू लागले आहेत.

कोण आहे मेधवी बिधुरी?

मेधवी बिधुरी ही दिल्लीची एक युवा लेग-स्पिनर आहे. ती उजव्या हाताने लेग-स्पिन गोलंदाजी करते आणि काही काळापासून दिल्लीच्या देशांतर्गत क्रिकेटचा भाग आहे. मेधवी यापूर्वी ‘दिल्ली प्रीमियर लीग’मध्ये खेळली आहे; ती २०२५ मध्ये ‘साउथ दिल्ली सुपरस्टार्स’ संघाचा भाग होती आणि २०२६ च्या हंगामात ‘सेंट्रल दिल्ली क्वीन्स’साठी खेळत आहे.

मेधवी बिधुरीच्या आतापर्यंतच्या क्रिकेट कारकिर्दीचा आढावा घेतल्यास, तिने ११ टी-२० सामन्यांमध्ये ११ बळी घेतले आहेत. या काळात तिची सर्वोत्तम कामगिरी म्हणजे २० धावांत ३ बळी घेणं ही होती. तिचा ‘इकॉनॉमी रेट’ ६.६८ इतका आहे, जो या प्रकारच्या क्रिकेटमध्ये प्रभावी मानला जातो. ‘वुमन्स दिल्ली प्रीमियर लीग २०२६’ च्या सलामीच्या सामन्यात मेधवीला आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही, तरीही तिची गोलंदाजी आणि ‘६-७’ अशी केलेली सेलिब्रेशनची पद्धत यामुळे ती सोशल मीडियावर नक्कीच चर्चेचा विषय ठरली.