Who Is Ramakrishna Ghosh: आयपीएल २०२६ स्पर्धेत ५ वेळचे चॅम्पियन संघ एक एक विजय मिळवण्यासाठी संघर्ष करताना दिसून येत आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा चेन्नई सुपर किंग्जचा संघ गुणतालिकेत ९ व्या स्थानी आहे. तर चेन्नईचा संघ गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. गेल्यावेळी वानखेडे स्टेडियमवर जेव्हा हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते, त्यावेळी चेन्नई एकतर्फी विजयाची नोंद केली होती. आता चेन्नईच्या होम ग्राऊंडवर मुंबईचा संघ पराभवाची परतफेड करण्यासाठी मैदानात उतरला आहे. या सामन्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या प्लेईंग ११ मध्ये बदल पाहायला मिळाला आहे. चेन्नईच्या ताफ्यात महाराष्ट्राकडून खेळणाऱ्या खेळाडूला संधी देण्यात आली आहे. दरम्यान रामकृष्ण घोष आहे तरी कोण? जाणून घ्या.
मुंबई इंडियन्सविरूद्धच्या सामन्यात महाराष्ट्राच्या २८ वर्षीय रामकृष्ण घोषला संधी देण्यात आली आहे. नाशिकमध्ये जन्मलेला रामकृष्ण घोष देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतो. आपल्या अष्टपैलू कामगिरीने त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मध्यमगती गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा आणि फलंदाजीत हातभार लावणाऱ्या रामकृष्ण घोषला चेन्नईने आयपीएल २०२५ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ३० लाखांची बोली लावून आपल्या संघात स्थान दिलं होतं. त्याला पदार्पणाची संधी दिली गेली नव्हती. पण त्याची गोलंदाजी पाहून त्याला चेन्नईने आयपीएल २०२६ स्पर्धेसाठी रिटेन केलं होतं. आता या हंगामातील दुसऱ्या टप्प्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे.
रामकृष्ण घोष हा मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलगा आहे, ज्याला महाराष्ट्राच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. पण त्याने कधीच हार मानली नाही. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडून आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत तो चमकला. या स्पर्धेत त्याला ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली खेळण्याची संधी मिळाली. ऋतुराज गायकवाड हा पुणेरी बाप्पा संघाचा कर्णधार आहे. आता तो पुन्हा एकदा ऋतुराज गायकवाडच्या नेृतृत्वाखाली खेळत आहे. तो सर्वात चर्चेत तेव्हा आला, जेव्हा त्याने विजय हजारे ट्रॉफीत हिमाचल प्रदेश संघाविरूद्ध खेळताना एकाच डावात ४२ डावात ७ गडी बाद केले होते.
आता मुंबई इंडियन्सविरूद्ध खेळताना त्याने सुरुवातीलाच विल जॅक्सला बाद करण्यासाठी भन्नाट कॅच घेतला. त्यानंतर त्याने २१ धावांवर फलंदाजी करत असलेल्या सूर्यकुमार यादवला झेलबाद करत माघारी धाडलं.
