Who is Vaishnavi Sharma India Debutant: भारताच्या महिला संघाने १९ वर्षांखालील टी-२० विश्वचषकात आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधलं आहे. भारतीय संघाने दोन सामने जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. भारताने मलेशिया संघाला ३२ धावांत ऑल आऊट करत प्रत्युत्तरात १७ चेंडूत सामना जिंकला. भारताच्या या विजयाची खरी मॅचविनर ठरली भारताची फिरकीपटू वैष्णवी शर्मा.

भारताच्या वैष्णवी शर्माने भारताकडून मलेशियाविरूद्धच्या सामन्यात पदार्पण केले. वैष्णवीने पदार्पणाच्या सामन्यातच टी-२० मध्ये ५ विकेट्स घेतले आणि त्याहूनही मोठी गोष्ट म्हणजे तिने या सामन्यात हॅटट्रिकही घेतली. पदार्पणाच्या सामन्यात ५ विकेट्स आणि हॅटट्रिक घेणारी वैष्णवी ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

vicky kaushal said i am from mumbai i can speaks good marathi during visite in Sambhajinagar
मी मुंबईचा, मराठीही चांगली येते, अभिनेता विकी कौशलचा तरुणाईशी संवाद
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Karuna and Dhananjay Munde
Anjali Damania : अंजली दमानियांची पोस्ट चर्चेत, “करुणा या धनंजय मुंडेंच्या पहिल्या पत्नी, मी…”
Mamta Kulkarni On Dhirendra Shastri (1)
धीरेंद्र शास्त्रींचं नाव ऐकताच ममता कुलकर्णीचा संताप; म्हणाली, “त्याचं जितकं वय तितकी वर्षे…”, रामदेव बाबांवरही आगपाखड
shweta kharat
“प्रत्येक माणसाबद्दल…”, ‘पारू’ फेम श्वेता खरातने सांगितला हर्षदा खानविलकर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव; म्हणाली…
Harshit Rana became the first indian to make his T20I debut as a concussion substitute in IND vs ENG
Harshit Rana : हर्षित राणाने घडवला इतिहास! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला पहिलाच भारतीय खेळाडू
Interstate gang of asphalt thieves arrested with valuables
डांबर चोरणारी आंतरराज्य टोळी मुद्देमालासह पकडली
response on loksatta article
लोकमानस : चिंता सर्वांनाच, दखल मात्र नाही!

कोण आहे वैष्णवी शर्मा?

मलेशियाविरुद्ध हॅटट्रिक घेत आपल्या गोलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेणारी वैष्णवी ही ग्वाल्हेरची रहिवासी आहे. वैष्णवीचे घर ग्वाल्हेरच्या चंबळ भागात आहे आणि भारतीय संघात स्थान मिळवणारी ती या ठिकाणची एकमेव महिला क्रिकेटर आहे. वैष्णवी शर्मा ही डावखुरी फिरकी गोलंदाज आहे. वैष्णवीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची खूप आवड होती. आपल्या मुलीला क्रिकेटच्या जगात यशस्वी करण्यासाठी वडिलांनी खूप मेहनत घेतली. वैष्णवीचे वडील, व्यवसायाने ज्योतिषी आहेत, त्यांनी चंबळमध्ये प्रशिक्षणाच्या चांगल्या सुविधा नसल्यामुळे आपल्या मुलीला ग्वाल्हेरच्या तानसेन क्रिकेट अकादमीमध्ये दाखल केले. या अकादमीत पाऊल ठेवत वैष्णवीने क्रिकेटचे धडे गिरवले.

वैष्णवीने लहानपणापासूनच क्रिकेटच्या मैदानावरील आपली चुणूक दाखवली. २०१७ मध्ये वैष्णवीकडे मध्य प्रदेशच्या १६ वर्षांखालील संघाची धुराही सोपवण्यात आली होती. यानंतर वैष्णवीने मागे वळून पाहिले नाही. २०२२ मध्ये, वैष्णवीने तिच्या गोलंदाजीने खूप नाव कमावले आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या.

२०२२-२३ मध्ये ज्युनियर महिला क्रिकेटमध्ये केलेल्या दमदार कामगिरीबद्दल वैष्णवीला बीसीसीआयने दालमिया पुरस्कारानेही सन्मानित केले. वैष्णवीसमोर १९वर्षांखालील टी-२० वर्ल्डकप सामन्यात मलेशियाचे फलंदाज पूर्णपणे फेल ठरले. वैष्णवीने ४ षटकांच्या स्पेलमध्ये केवळ ५ धावा दिल्या आणि पाच विकेट धघेत कहर केला. वैष्णवीने एक मेडन ओव्हरही टाकली.

मलेशियाविरुद्धच्या १९ वर्षांखालील महिला टी-२० विश्वचषक सामन्यात डावखुरी फिरकीपटू वैष्णवी शर्माने ऐतिहासिक कामगिरी केली. या कामगिरीबाबत ब्रॉडकास्टरशी संवाद साधताना तिने या दमदार कामगिरीमागील रहस्यही उघड केले. तिने सांगितले की, ती रवींद्र जडेजा आणि राधा यादव यांना फॉलो करते. त्यांच्याप्रमाणे विकेट टू विकेट गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न करते. ज्याचा त्याला फायदा झाला आहे. जेव्हा वैष्णवीला विचारण्यात आले की ५ विकेट्सपैकी तिची आवडती विकेट कोणती आहे, तेव्हा तिने ज्या विकेटवर हॅट्ट्रिक पूर्ण केली होती ती तिची आवडती विकेट असल्याचे तिने सांगितले.

Story img Loader