Who Will be India’s Captain After Rohit Sharma: भारतीय संघाने T20 विश्वचषक २०२४ चे विजेतेपद पटकावताच, रोहित शर्माने टी-२० क्रिकेटचा निरोप घेतला. आता भारतीय संघात दोन कर्णधार आहेत. रोहित शर्माकडे वनडे आणि कसोटीत कर्णधारपदाची जबाबदारी आहे. तर सूर्यकुमार यादव टी-२० मध्ये कर्णधार आहे. पण रोहित शर्मा तिन्ही फॉरमॅटनधून निवृत्त घेतल्यानंतर भारतीय संघाला नव्या कर्णधाराची गरज भासणार आहे. दिनेश कार्तिकने रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण असेल यासाठी दोन खेळाडूंची नावे घेतली आहेत.
रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने कायमच चांगली कामगिरी केली आहे. या कामगिरीनंतर आता रोहित शर्माचा उत्तराधिकारी कोण असेल, याचा सर्वांनाच प्रश्न पडला आहे. रोहित शर्मा आता ३७ वर्षांचा आहे, अजून ३ ते ४ वर्षे तो क्रिकेटच्या मैदानावर दिसेल, पण त्यानंतर वनडे आणि कसोटीत भारताची धुरा कोण सांभाळणार, यावर दिनेश कार्तिकने उत्तर दिले की शुबमन गिल, ऋषभ पंत.
हेही वाचा – Saina Nehwal: ऑलिम्पिक पदक गिफ्ट मिळालं म्हणणाऱ्यांवर सायना नेहवालचा संताप; म्हणाली, “आधी ऑलिम्पिकसाठी…”
क्रिकबझ शोमध्ये एका चाहत्याने दिनेश कार्तिकला विचारले की भारताचा तिन्ही फॉरमॅटमधील पुढीस कर्णधार कोण असेल? याला उत्तर देताना भारताचा माजी यष्टीरक्षक फलंदाज म्हणाला, “माझ्यासमोर दोन खेळाडू येतात, जे तरुण खेळाडू आहेत. ज्यांच्याकडे क्षमता आहे आणि ते निश्चितपणे प्रत्येक फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व करू शकतात. एक ऋषभ पंत आणि दुसरा शुबमन गिल. दोघेही आयपीएल संघांचे कर्णधार असून त्यांनी भारताचे नेतृत्वही केले आहे. मला वाटते जेव्हा वेळ येईल तेव्हा या दोघांनाही भारताचा ऑल फॉरमॅट कर्णधार बनण्याची संधी मिळेल.”
वनडे आणि टी-२० संघाचा उपकर्णधार
ऋषभ पंत आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार आहे. डिसेंबर २०२२ मध्ये अपघात झाल्यानंतर आयपीएल २०२४ मधून तो मैदानात परतला. यानंतर तो २०२४ चा टी-२० विश्वचषकही खेळला. तर हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्समध्ये गेल्यानंतर शुबमन गिलला गुजरात टायटन्सचा कर्णधार बनवण्यात आले. गिलकडे झिम्बाब्वे दौऱ्यावर भारतीय संघाची कमान सोपवण्यात आली होती. त्याने भारताच्या टी-२० संघाचे कर्णधारपद भूषवले आणि मालिकाही जिंकली. यासह त्याला वनडे संघाचा उपकर्णधारपदही देण्यात आले होते.