scorecardresearch

Premium

२०११ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये झालेला दोन वेळा टॉस, कारण काय?

२०११ च्या वर्ल्डकप फायनलमध्ये एक मजेशीर गोष्ट घडली होती. या सामन्यात दोन वेळा नाणेफेक (टॉस) झाली होती.

kumar sangakkara ms dhoni t
२०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक स्पर्धा जिंकली होती. (PC : Videograb/Indian Express)

भारतीय क्रिकेट संघाने आतापर्यंत दोन वेळा क्रिकेट विश्वचषक स्पर्धा जिंकली आहे. १९८३ साली कपिल देवच्या नेतृत्वात भारताने पहिल्यांदा विश्वचषक उंचावला. त्यानंतर तब्बल २८ वर्षांनी म्हणजेच २०११ साली महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताने विश्वचषक स्पर्धा जिंकली. २ एप्रिल २०११ रोजी भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये अंतिम सामना खेळवण्यात आला होता. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित ५० षटकांत ६ बाद २७४ धावा फटकावल्या होत्या. तर भारताने ४८.२ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात हे लक्ष्य साध्य करून विश्वविजेतेपद मिळवलं होतं.

दरम्यान, या सामन्यात एक मजेशीर गोष्ट घडली होती. या सामन्यात दोन वेळा नाणेफेक (टॉस) झाली होती. अलिकडेच याबद्दल श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकाराने खुलासा केला आहे. भारताचा फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनशी लाईव्ह चॅट करताना संगकाराने याबद्दल माहिती दिली.

Captain Rohit gets emotional before starting World Cup campaign Said Being an Indian player is not easy
IND vs AUS, World Cup: विश्वचषक मोहिमेला सुरुवात करण्यापूर्वी कॅप्टन रोहित झाला भावूक; म्हणाला, “भारतीय खेळाडू होणे सोपे…”
Cricket field became a war arena Bangladeshi players beat each other with bats 6 people admitted to hospital
Cricket Fight: क्रिकेट सामन्याचे WWE मध्ये रूपांतर, बॅट अन् स्टंपने तुफान हाणामारी, सहा खेळाडू गंभीर जखमी; पाहा Video
Asian Games 2023 IND vs MAL: Shafali Verma's brilliant half-century Team India set a challenge of 177 runs in front of Malaysia
Asian Games 2023, IND vs MAL: शफाली वर्माचे शानदार अर्धशतक! पावसामुळे सामना रद्द, टीम इंडिया चांगल्या रँकिंगच्या जोरावर पोहोचली सेमीफायनलला
India vs Sri Lanka Asia Cup 2002
Asia Cup: कोलंबो येथील भारत-पाक सामन्यातील पावसाने करून दिली २००२ ची आठवण, जाणून घ्या काय झाले होते?

संगकारा म्हणाला, त्या सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम प्रेक्षकांनी खचाखच भरलं होतं. श्रीलंकेत इतकी गर्दी होत नाही. असं केवळ भारतातच होतं. भारतात इतकी गर्दी असते की, खेळाडूंना एकमेकांचं बोलणं ऐकू येत नाही. एकदा कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर असं झालं होतं. मी यष्टीरक्षण करत असताना स्लिपमध्ये उभ्या असलेल्या आमच्या खेळाडूचं बोलणं मला काहीच ऐकू येत नव्हतं. वानखेडेतही तशीच परिस्थिती होती. सामन्याआधी सामनाधिकाऱ्यांनी नाणं उडवलं, परंतु, मी काय बोललं ते माहीला (एमएस धोनी) कळलंच नाही.

त्यानंतर धोनीने मला विचारलं, तू टेल्स बोललास का? मी त्याला म्हटलं नाही, मी हेड्स बोललो, मग मॅच रेफरींनी मला सांगितलं की मी नाणेफेक जिंकलोय. मग माही म्हणाला नाही, मला काही कळलंच नाही. तिथे थोडा गोंधळ झाला. मग माही म्हणाला आपण पुन्हा नाणेफेक करुया. त्यानंतर पुन्हा एकदा नाणं उडवलं.

हे ही वाचा >> नवव्या वर्षी उचलली बंदूक, १३ व्या वर्षी नॅशनल चॅम्पियन, Asiam Games मध्ये ४ पदकं जिंकून वडिलांच्या कष्टाचं चीज केलं

दरम्यान, दुसऱ्यांदा झालेली नाणेफेक कुमार संगकाराने जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने निर्धारित ५० षटकांत ६ बाद २७४ धावांचा डोंगर उभा केला. श्रीलंकेचं हे आव्हान भारताने ४८.२ षटकांत ४ गड्यांच्या बदल्यात पूर्ण केलं.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Why 2011 world cup final toss was done twice kumar sangakkara ms dhoni asc

First published on: 29-09-2023 at 18:51 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×