scorecardresearch

Fifa World Cup 2022: पेनल्टीवर मी गोल का करू शकलो नाही? स्वत:च्या अपयशामुळे मेस्सी हैराण

अर्जेंटिनाने पोलंडचा पराभव करत लिओनेल मेस्सीच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. ज्यामध्ये कर्णधार लिओनेल मेस्सीची कामगिरी खूपच निराशाजनक होती.

Fifa World Cup 2022: पेनल्टीवर मी गोल का करू शकलो नाही? स्वत:च्या अपयशामुळे मेस्सी हैराण
मॅराडोनाने मेस्सीला सल्ला दिला (संग्रहित छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

कतारमध्ये खेळल्या जात असलेल्या फिफा विश्वचषक २०२२ मध्ये अर्जेंटिनाने पोलंडचा २-० ने गट-क सामन्यात पराभव केला. या विजयासह लिओनेल मेस्सीच्या संघाने उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. उपांत्यपूर्व फेरीत अर्जेंटिनाचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. हा सामना अर्जेंटिनाच्या संघाने जिंकला असेल, पण कर्णधार लिओनेल मेस्सीची कामगिरी खूपच निराशाजनक होती. पेनल्टीवरही गोल करता आला नाही, यावरून मेस्सीच्या कामगिरीचा अंदाज लावता येतो.

मेस्सीची पेनल्टी किक पोलंडचा गोलरक्षक वोज्शिच सैनीने डावीकडे डायव्हिंग करून वाचवली. ही ३१वी पेनल्टी होती जी मेस्सीला त्याच्या कारकिर्दीत रूपांतरित करता आली नाही. पेनल्टी किक चुकल्यानंतर मेस्सी म्हणाला, ”पेनल्टी किक चुकल्याने मी खरोखर निराश झालो होतो, कारण मला माहित होते की एक गोल संपूर्ण सामना बदलू शकतो, तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीने खेळण्यास भाग पाडतो. पण मला वाटते की पेनल्टी चुकल्याने संघ मजबूत झाला.”

मेस्सी पुढे म्हणाला, “मला पेनल्टी चुकल्याचा राग आहे. पण माझ्या चुकीनंतर संघ मजबूत झाला. संघाला खात्री होती की आपण जिंकणार आहोत, फक्त पहिला गोल करायचा होता. त्यानंतर आम्हाला हवे तसे झाले.”

पेनल्टी किक चुकल्यानंतर मॅराडोनाने मेस्सीला सांगितले, ‘ऐक, जेव्हा तुम्ही चेंडू मारता तेव्हा इतक्या लवकर पाय मागे घेऊ नका. कारण तुम्हाला काय करायचे आहे ते समजणार नाही.’ हा एक उत्तम सल्ला होता. कारण तो जे म्हणत होता ते म्हणजे बॉल अनुभवा. माझ्यासाठी तो चामड्याचा आणि हवेचा तुकडा आहे आणि दुसरे काही नाही, परंतु त्याच्यासारख्या प्रतिभावान व्यक्तीसाठी हे काहीतरी वेगळे आहे.

हेही वाचा – फिफा विश्वचषकादरम्यान दिग्गज खेळाडू पेले रुग्णालयात दाखल; ब्राझीलचा स्टार कॅन्सरशी देत आहे झुंज

अर्जेंटिना आणि पोलंड यांच्यातील सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दोन्ही संघांना पूर्वार्धात एकही गोल करता आला नाही. त्यामुळे तो ०-० असा बरोबरीत राहिला. यानंतर उत्तरार्धात अर्जेंटिनाने चुकांमधून धडा घेत शानदार खेळ दाखवला. अॅलेक्सिस अॅलिस्टरने ४६व्या मिनिटाला संघासाठी पहिला गोल केला. त्यानंतर ६७व्या मिनिटाला ज्युलियन अल्वारेझने गोल करून अर्जेंटिनाच्या बाजूने स्कोअर २-० केला. येथून पोलंड बॅकफूटवर आला आणि सामना वाचवू शकला.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 11:13 IST

संबंधित बातम्या