Why is England Australia Test Series Called The Ashes: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील प्रतिष्ठित अ‍ॅशेस कसोटी मालिकेला (The Ashes 2024-25) सुरूवात होत आहे. ही मालिका उद्या म्हणजेच २१ नोव्हेंबरपासून पर्थमधील पर्थ स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. इंग्लंड व ऑस्ट्रेलिया संघांतील हे द्वंद्व फार पूर्वीपासून चालत आहे. या दोन्ही संघांमधील या मालिकेला अ‍ॅशेस असं नाव देण्यात आलं. इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अ‍ॅशेस हा शब्द वापरण्यात आला होता. पण हे नाव का, कसं पडलं, जाणून घेऊया.

अ‍ॅशेस मालिका २०२५-२६ ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार आहे. पण पहिल्याच सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाचा वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार पॅट कमिन्स उपलब्ध असणार नाहीये. त्यामुळे संघाची कमान स्टीव्ह स्मिथच्या नावे आहे. तर इंग्लंड संघाचे नेतृत्त्व बेन स्टोक्स करणार आहे.

इंग्लंडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अ‍ॅशेस हा शब्द वापरात आला. १८८२ च्या मालिकेत इंग्लंड उत्कृष्ट फॉर्ममध्ये होता, परंतु २१ ऑगस्ट १८८२ रोजी ओव्हलमध्ये झालेल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदाच इंग्लंडचा ७ गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे इंग्लंडचा क्रिकेट चाहता वर्ग खूप दु:ख झाली होता.

ऑस्ट्रेलिया-इंग्लंड कसोटी मालिकेला अ‍ॅशेस नाव कसं पडलं?

ऑस्ट्रेलियाने केलेल्या इंग्लंडच्या पराभवानंतर इंग्लंडचे प्रसिद्ध वृत्तपत्र, द स्पोर्टिंग टाईम्सने श्रद्धांजली वाहत माहिती छापली ज्यात, “इंग्लिश क्रिकेट २९ ऑगस्ट १८८२ रोजी ओव्हलच्या मैदानावर मृत पावलं आहे. त्यांचा चाहता वर्ग शोकाकुल आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार केले जातील आणि राख नंतर ऑस्ट्रेलियाला पाठवली जाईल.” या वृत्तपत्रातील दुख:द बातमी या मथळ्यासह छापलेल्या या बातमीनंतर मालिकेला अ‍ॅशेस असे नाव देण्यात आले.

इंग्लंड क्रिकेटच्या मृत्यूबद्दलच्या मथळ्यावरून अ‍ॅशेस हे नाव पुढे आले, जे अजूनही जगात प्रचलित आहे. या घटनेनंतर, पुढील मालिका ऑस्ट्रेलियन भूमीवर होणार होती. त्याआधी इंग्लंडचा कर्णधार इव्हो ब्लिगने राख परत आणण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियामध्ये ही मालिका २-१ अशी जिंकली. मेलबर्नधील विजयानंतर, काही महिलांनी इंग्लंडचे कर्णधार इव्हो ब्लिग यांना कलशसारखी ट्रॉफी दिली होती. तिसऱ्या कसोटीत वापरल्या गेलेल्या बेल्सची राख त्या ट्रॉफीमध्ये होती.

इंग्लंडने त्यानंतर पुढील आठ मालिका जिंकल्या आणि ऑस्ट्रेलियाने १८९१-९२ मध्ये पहिल्यांदाच अ‍ॅशेस मालिका जिंकली. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील द्वंद्व १९३२-३३ च्या मालिकेसाठी देखील लक्षात ठेवले जाते, जी बॉडीलाइन मालिका म्हणून ओळखली जाते.

ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांना रोखण्यासाठी, इंग्लंडने फलंदाजाच्या शरीरावर गोलंदाजी करण्याची आणि बहुतेक क्षेत्ररक्षकांना लेग साईडजवळ ठेवण्याची रणनीती आखली होती. डग्लस जार्डिन यांची ही रणनीती प्रभावी ठरली आणि इंग्लंडने मालिका जिंकली. आजपर्यंत या दोन्ही देशांमध्ये ३४६ कसोटी सामने खेळले गेले आहेत. ऑस्ट्रेलियाने यापैकी १४४ सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने १०८ सामने जिंकले आहेत आणि ९४ सामने अनिर्णित राहिले.