IND vs AUS 5th Test India wearing pink kits : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रविवारी सिडनी येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतीय संघाने गुलाबी खुणा असलेली जर्सी परिधान केली. जेन मॅकग्रा डेच्या सन्मानार्थ हा निर्णय घेण्यात आला आहे. दिवसाच्या सुरुवातीपूर्वी, भारतीय संघाने माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅकग्राला स्वाक्षरी केलेली टोपी दिली. ग्लेन मॅकग्राची पत्नी जेन यांचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या स्मरणार्थ, सिडनी क्रिकेट मैदानावर खेळल्या गेलेल्या वर्षातील पहिल्या कसोटीचा तिसरा दिवस पिंक डे म्हणून साजरा केला जातो.

Y

Y

भारताने तिसऱ्या दिवशी गुलाबी पट्टे असलेली जर्सी का घातली?

मॅकग्रा फाऊंडेशनसाठी निधी उभारण्यासाठी सिडनी कसोटीचा तिसरा दिवस पिंक डे म्हणून ओळखला जातो. या दिवशी स्टेडियम, आजूबाजूचे फलक आणि स्टंप देखील गुलाबी रंगात सजवले जातात. स्तनाच्या कर्करोगाबाबत जनजागृती करणे हा त्याचा उद्देश आहे. स्तनाच्या कर्करोगाने जेन मॅकग्राच्या मृत्यूनंतर पती ग्लेन मॅकग्रा यांनी २००५ मध्ये मॅकग्रा फाऊंडेशनची स्थापना केली. ब्रेस्ट कॅन्सरच्या रुग्णांसाठी आणि वाचलेल्यांसाठी जागरूकता आणि निधी उभारण्यासाठी फाउंडेशन क्रिकेट ऑस्ट्रेलियासोबत काम करते.

जेन मॅकग्राची कथा अतिशय हृदयस्पर्शी आहे. स्तनाच्या कर्करोगाशी तिचा दीर्घकाळ संघर्ष होता. ग्लेन मॅकग्रा यांनी आपल्या पत्नीच्या स्मरणार्थ या रोगाशी लढा देण्यासाठी अधिकाधिक लोकांना मदत करण्यासाठी या फाउंडेशनची स्थापना केली. मॅकग्रा फाऊंडेशन ब्रेस्ट कॅन्सरबद्दल जागरुकता पसरवण्यासाठी, संशोधनासाठी निधी उभारण्यासाठी आणि रुग्णांना मदत करण्यासाठी काम करते.

हेही वाचा – Yuzvendra Chahal : ‘जगाला माहीत आहे…’, चहल-धनश्रीच्या घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान युजवेंद्रची इन्स्टा स्टोरी व्हायरल

सामन्याबद्दल बोलायचे, तर तिसऱ्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात तीन गडी गमावून ७१ धावा केल्या होत्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी अजूनही ९१ धावांची गरज आहे. भारताने १६२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारताचा आज दुसरा डाव १५७ धावांवर आटोपला आणि पहिल्या डावातील चार धावांच्या आघाडीसह एकूण १६१ धावांची आघाडी घेतली. भारताने आज केवळ १६ धावा केल्यानंतर उर्वरित चार विकेट्स गमावल्या. यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात आक्रमक सुरुवात केली.

हेही वाचा – IND vs AUS : बोलंडच्या दमदार गोलंदाजीसमोर पंतचे अर्धशतक पडले फिके, ऑस्ट्रेलियाला विजयासाठी मिळाले १६२ धावांचे लक्ष्य

u

बुमराहच्या अनुपस्थितीत उस्मान ख्वाजा आणि सॅम कॉन्स्टास यांनी २३ चेंडूत ३९ धावांची भागीदारी केली. यानंतर प्रसीध कृष्णाने कोंटासला बाद करून ही भागीदारी तोडली. १७ चेंडूत २२ धावा करून कॉन्स्टास बाद झाला. त्यानंतर प्रसिधने लबूशेन (६) आणि स्टीव्हन स्मिथ (४) यांनाही बाद केले. सध्या ख्वाजा १९ धावा करून क्रीजवर असून ट्रॅव्हिस हेडने पाच धावा केल्या आहेत.

Story img Loader