MS Dhoni Suresh Raina Retires on Independence Day: भारतीय क्रिकेट संघाला आपल्या कार्यकाळात ३ आयसीसी ट्रॉफी जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावणारा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने स्वातंत्र्यदिनीच २०२० साली निवृत्ती जाहीर केली. पण धोनीबरोबरच सुरेश रैनानेही निवृत्तीचा धक्का दिला. धोनी आयपीएलमध्ये थाला या नावानेही प्रसिद्ध आहे तर धोनीचा मित्र आणि भारताचा स्टार खेळाडू सुरेश रैनाला चिन्ना थाला म्हणतात. १५ ऑगस्ट २०२० रोजी या दोन दिग्गजांनी घेतलेल्या एका निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. महेंद्रसिंग धोनी आणि सुरेश रैनाने एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्ती घेण्यासाठी दोन्ही खेळाडूंनी स्वातंत्र्यदिन का निवडला? याचा सुरेश रैनाने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. हेही वाचा - Shakib Al Hasan: “बांगलादेशातील लोकांच्या हत्येला शकीबही जबाबदार…”, पाकिस्तानविरूद्ध मालिकेसाठी निवड होताच शकीब अल हसनवर कठोर शब्दात टीका भारतातील लोक १५ ऑगस्ट २०२० रोजी ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत होते. त्याच दिवशी महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन चाहत्यांना मोठा धक्का दिला. हा धक्का चाहते पचवतात तोवर धोनीबरोबर रैनानेही निवृत्ती घेतली होती. रैनाने मुलाखतीत सांगितले की, दोघेही १५ ऑगस्टला का निवृत्त झाले. हेही वाचा - Shakib Al Hasan: शकीबचा सुपर ओव्हर खेळायला नकार; स्पर्धेतून बाहेर पडण्याची ओढवली नामुष्की-जेतेपदही गमावलं सुरेश रैनाने सांगितले की, आम्ही दोघांनी आधीच हे ठरवून ठेवलं होतं. धोनीचा जर्सी क्रमांक सात आणि माझा जर्सी क्रमांक ३ होता. जर तुम्ही हे दोन्ही एकत्र केले तर ते ७३ होईल. तर १५ ऑगस्ट रोजी भारत ७३ वा स्वातंत्र्यदिन साजरा करत होता. त्यामुळे यापेक्षा चांगला दिवस असू शकत नाही असे आम्हाला वाटले. रैनाने पुढे सांगितले की, धोनीने २००४ साली बांगलादेशविरुद्ध पदार्पण केले होते. मी २००५ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले होते. आम्ही दोघांनी आमची आंतरराष्ट्रीय कारकीर्द आणि नंतर आयपीएल खेळायला एकत्र सुरू केले. हेही वाचा - Independence Day 2024: ऑलिम्पिकचे आयोजन भारतात करण्याबाबत पंतप्रधान मोदींचे मोठे वक्तव्य, स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात म्हणाले…. सुरेश रैना भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळताना दिसला आहे. रैना मैदानावर एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून आपली कामगिरी चोख पार पाडायचा. रैनाने भारतासाठी २२६ एकदिवसीय सामने खेळले असून त्यात त्याने ५६१५ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत त्याच्या नावावर ३६ विकेट आहेत. रैनाने १८ कसोटी आणि ७८ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याच्या नावावर ७६८ आणि १६०५ धावा आहेत.