IPL 2026 KKR vs PBKS Match Playing 11: आयपीएल २०२६ मध्ये आजचा ६ एप्रिलचा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्स यांच्यात होत आहे. या सामन्यापूर्वी केकेआरला दोन मोठे धक्के बसले आहेत, कारण त्यांचे दोन महत्त्वाचे खेळाडू संघाबाहेर झाले आहेत. केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणेने नाणेफेकीच्या वेळी जाहीर केलं की, वरुण चक्रवर्ती आणि सुनील नरेन या सामन्यात खेळणार नाहीत. कोलकाता नाईट रायडर्ससाठी यंदाच्या मोहिमेची सुरूवात फारच खराब झाली असून संघाने सुरूवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सने या सामन्याची नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर पंजाब किंग्सचा संघ गोलंदाजीने सामन्याला सुरूवात करेल. अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर संघांतील बदलांविषयी सांगताच चाहत्यांना धक्का बसला. आजच्या सामन्यात वरूण चक्रवर्ती आणि सुनील नरेन हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसणार नाहीत.

नाणेफेकीच्या वेळी केकेआरचा कर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, “आम्ही या सामन्यासाठी संघात दोन बदल केले आहेत आणि हे दोन्ही बदल जबरदस्ती करावे लागले अआहेत. वरुण चक्रवर्ती मागील सामन्यात झेल घेताना जखमी झाला होता आणि त्यामुळे तो या सामन्यात खेळत नाहीये. सुनील नरेन आजारी असल्याने या सामन्यात खेळताना दिसणार नाही. त्याच्या जागी रोव्हमन पॉवेल आणि नवदीप सैनी यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.”

अजिंक्य रहाणे पुढे म्हणाला, “आम्ही प्रथम फलंदाजी करू. खेळपट्टी चांगली दिसते आहे; थोडी कोरडी आहे, पण खूप चांगली खेळपट्टी आहे आणि त्यावर गवत कमी आहे. म्हणूनच आम्ही प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.” सामना जिंकण्याबद्दल तो म्हणाला, “हे सर्व विश्वास आणि आत्मविश्वासावर अवलंबून आहे. आम्ही सर्वांनी चांगली तयारी केली आहे. प्रत्येक खेळाडूने मेहनत घेत चांगला सराव केला आहे. टी२० फॉरमॅटमध्ये, छोट्या छोट्या क्षणांवर विजय मिळवणं महत्त्वाचं असतं. आपलं सर्वोत्तम देणं गरजेचं असतं. मी म्हटल्याप्रमाणे, एक संघ म्हणून आमचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे.”

KKR विरुद्ध PBKS सामन्यासाठी दोन्ही संघांसाठी प्लेइंग इलेव्हन

केकेआर प्लेइंग इलेव्हन:
फिन ऍलन, अजिंक्य रहाणे (कर्णधार), कॅमेरून ग्रीन, अंगक्रिश रघुवंशी (यष्टीरक्षक), रोव्हमन पॉवेल, रिंकू सिंह, रमणदीप सिंग, अनुकूल रॉय, नवदीप सैनी, वैभव अरोरा, कार्तिक त्यागी.

पंजाब किंग्ज प्लेइंग इलेव्हन:
प्रभसिमरन सिंग (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), कूपर कॉनोली, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉइनिस, मार्को यान्सन, झेवियर बार्टलेट, विजयकुमार वैशाक, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.