scorecardresearch

“आऊट ऑफ फॉर्म ऋषभ पंतला…”, पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूने धवनच्या कॅप्टन्सीवर केली टीका

पाकिस्तानचा माजी डावखुरा फलंदाज याने शिखर धवनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आऊट ऑफ फॉर्म ऋषभ पंतच्या संघातील फलंदाजी क्रमाबाबत धवनला खडेबोल सुनावले.

“आऊट ऑफ फॉर्म ऋषभ पंतला…”, पाकिस्तानच्या माजी दिग्गज खेळाडूने धवनच्या कॅप्टन्सीवर केली टीका
संग्रहित छायाचित्र (ट्विटर)

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. मालिकेतील शेवटचा सामना, बुधवारी ३० नोव्हेंबर रोजी खेळला गेला, तो पावसामुळे रद्द झाला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील दोन सामने पावसामुळे वाहून गेले, तर न्यूझीलंडचा संघ पहिला सामना जिंकण्यात यशस्वी ठरला. या विजयासह न्यूझीलंडने मालिकेवरही कब्जा केला. पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि दिग्गज डावखुरा फलंदाज सलमान बट्टने न्यूझीलंड दौऱ्यावरील भारताचा कर्णधार शिखर धवनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आऊट ऑफ फॉर्म ऋषभ पंतला धवनने इनफॉर्म फलंदाज ‘द स्काय’ सूर्यकुमार यादवच्या आधी फलंदाजीला का पाठवले यावर टीका केली आहे.

पंतला आधी फलंदाजीला का पाठवले?

ऋषभ पंत सध्या त्याच्या खराब फॉर्मशी झगडत आहे. टी२० विश्वचषकानंतर पंतला त्याच्या खराब फॉर्ममुळे ट्रोल केले जात आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० मालिकेतही पंत सलामीवीर म्हणून फ्लॉप ठरला. आता पाकिस्तानचा माजी दिग्गज खेळाडू सलमान बट्ट पंतबद्दल बोलला. तो म्हणाला की, “ऋषभ पंत खराब फॉर्ममध्ये असतानाही सतत चौथ्या क्रमांकावर का खेळला जात आहे, तर संघाकडे जगातील नंबर वन फलंदाज आहे. कर्णधाराबरोबर प्रशिक्षक यांनी देखील याबाबत थोडे खेळाडूंचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.”

सूर्यकुमारला संधी मिळायला हवी होती

सलमान बट्ट सूर्यकुमारवर बोलताना म्हणाला, “पंत हा जबरदस्त खेळाडू आहे, यात शंका नाही. मात्र तो सध्या त्याचा फॉर्म हरवला आहे. त्यामुळे तो सूर्यकुमार यादवच्या आधी का फलंदाजी करत आहे हे मला समजत नाही. तुमच्या क्रिकेट कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यातून जात असलेल्या एखाद्याच्या जागी तुम्ही फॉर्म नसलेल्या फलंदाजाला संधी देत ​​आहात. यावरून कर्णधाराचे अज्ञान दिसून येते अशी खरपूस समाचार घेत त्याने धवनवर त्याच्या यूट्यूब चॅनलवरून टीका केली आणि त्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

हेही वाचा :   ६,६,६,६,६: निकोलस पूरनने काढली शाकिबच्या गोलंदाजीची पिसे; एकाच षटकात लगावले पाच षटकार, पाहा व्हिडिओ

सॅमसनला वाट पाहावी लागणार! धवनने दिले स्पष्टीकरण

तिसरा सामना पावसामुळे रद्द झाल्यानंतर धवन माध्यमांशी बोलताना म्हणाला की, “तुम्ही मोठा विचार करावा लागेल आणि मॅच विनर कोण आहे? हे ठरवावे लागेल. तुम्ही या गोष्टीचे विश्लेषण करता आणि तुमचे निर्णय याच गोष्टींवर आधारित असतात.” तो पुढे म्हणाला की, “नक्कीच संजू सॅमसनला ज्या संधी मिळाल्या आहेत, त्यात त्याने चांगले प्रदर्शन केले. पण कधी-कधी तुम्हा तुमच्या संधीची वाट पाहावी लागते. कारण दुसऱ्या खेळाडूंनी चांगले प्रदर्शन केले आहे. आपण त्याच्या (पंत) गुणवत्तेच्या आधारे जाणतो की, तो मॅच विनर आहे. याच कारणास्तव तो चांगले प्रदर्शन करत नसला, तेव्हा त्याचे पाठबळ देण्याची गरज आहे,” असे धवन पुढे बोलताना म्हणाला. पंतने न्यूझीलंड दौऱ्यात केलेल्या प्रदर्शनाचा विचार केला, तर ६, ११, १५ आणि १० असे राहिले आहे.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-12-2022 at 14:58 IST

संबंधित बातम्या