West Indies vs Italy Highlights: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील ३७ वा सामना वेस्ट इंडिज आणि इटली या दोन्ही संघांमध्ये पार पडला. वेस्ट इंडिजचा संघ आधीच सुपर ८ फेरीसाठी पात्र ठरला आहे. त्यामुळे इटलीविरुद्ध झालेला सामना हा वेस्ट इंडिजसाठी सराव सामना होता. या सामन्यातील पहिल्या डावात वेस्ट इंडिजने ६ गडी बाद १६५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना इटलीचा डाव अवघ्या १२३ धावांवर आटोपला. यासह वेस्ट इंडिजने हा सामना ४२ धावांनी आपल्या नावावर केला.
वेस्ट इंडिजने केल्या १६५ धावा
कोलकात्यातील इडन गार्डन्सच्या मैदानावर पार पडलेल्या या सामन्यात इटलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिजकडून शे होपने ४६ चेंडूंचा ७५ धावांची खेळी केली. शिमरॉन हेटमायर १ धावांवर माघारी परतला. रोस्टन चेसने २४ धावा केल्या. रोमन पॉवेल अवघ्या ९ धावांवर माघारी परतला. शेवटी रुदरफोर्डने नाबाद २४ धावा केल्या. तर मॅथ्यू फोर्डने नाबाद १६ धावा केल्या.
इटलीचा डाव १२३ धावांवर आटोपला
या सामन्यात इटलीला मोठा उलटफेर करण्यासाठी १६६ धावा करायच्या होत्या. पण वेस्ट इंडिजच्या गोलंदाजी आक्रमणासमोर इटलीच्या फलंदाजांचा निभाव लागू शकला नाही. इटलीकडून सलामीला आलेला जस्टिन मोस्का अवघ्या २ धावांवर माघारी परतला. तर अँथोनी मोस्का अवघ्या १९ धावा करून माघारी परतला. तर जैन नक्वी अवघ्या ६ धावा करून माघारी परतला. तर जे स्मट्सने २४ धावांचे योगदान दिले. कर्णधार मनेंटी अवघ्या ८ धावांवर माघारी परतला. इटलीकडून एकही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे वेस्ट इंडिजचा डाव अवघ्या १२३ धावांवर आटोपला.
वेस्ट इंडिजने आधीच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेतील सुपर ८ मध्ये प्रवेश केला आहे. वेस्ट इंडिजचा सुपर ८ फेरीतील पहिला सामना २३ फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे. तर २६ फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. वेस्ट इंडिजचा साखळी फेरीतील शेवटचा सामना १ मार्चला भारताविरुद्ध होणार आहे.
