बटलरच्या शतकामुळे इंग्लंडचा विजयी चौकार

‘अव्वल-१२’ फेरीतील या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १९ षटकांत १३७ धावांत आटोपला.

यष्टीरक्षक-फलंदाज जोस बटलरने (६७ चेंडूत नाबाद १०१ धावा) साकारलेल्या अप्रतिम शतकाच्या जोरावर इंग्लंडने सोमवारी ट्वेन्टी-२० विश्वचषकात श्रीलंकेवर २६ धावांनी मात केली. सलग चौथ्या विजयासह इंग्लंडने उपांत्य फेरीतील प्रवेश जवळपास निश्चित केला.

‘अव्वल-१२’ फेरीतील या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या १६४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव १९ षटकांत १३७ धावांत आटोपला. श्रीलंकेचे सलामीवीर पाथुम निसंका (१) आणि कुसाल परेरा (७) लवकर बाद झाले. चरिथ असलंका (२१) आणि भानुका राजपक्षे (२६) यांच्या योगदानानंतर वानिंदू हसरंगा (३४) आणि कर्णधार दसून शानका (२६) यांनी फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना श्रीलंकेला विजय मिळवून देता आला नाही.

तत्पूर्वी, इंग्लंडने २० षटकांत ४ बाद १६३ अशी धावसंख्या उभारली. जेसन रॉय (९), डेव्हिड मलान (६) आणि जॉनी बेअरस्टो (०) झटपट माघारी परतल्याने इंग्लंडची एकवेळ ३ बाद ३५ अशी अवस्था झाली. मात्र, बटलर आणि कर्णधार ईऑन मॉर्गन (४०) यांनी इंग्लंडला सावरले. या दोघांनी १३ षटकांत चौथ्या गड्यासाठी ११२ धावांची भागीदारी रचली. मॉर्गन बाद झाल्यावरही बटलरने फटकेबाजी सुरु ठेवताना अखेरच्या चेंडूवर षटकार मारत आपले शतक पूर्ण केले. बटलरच्या नाबाद १०१ धावांच्या खेळी सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. इंग्लंडने अखेरच्या १० षटकांत तब्बल ११६ धावा काढल्या.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत ४ बाद १६३ (जोस बटलर नाबाद १०१, ईऑन मॉर्गन ४०; वानिंदू हसरंगा ३/२१) विजयी वि. श्रीलंका : १९ षटकांत सर्वबाद १३७ (वानिंदू हसरंगा ३४, भानुका राजपक्षे २६; मोईन अली २/१५, आदिल रशीद २/१९)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Wicketkeeper batsman jose butler england advance to the semi finals akp

Next Story
सचिन संपलेला नाही!
ताज्या बातम्या