गंगटोक : भारताचे दिग्गज फुटबॉलपटू ब्रुनो कुटिन्हो आणि आयएम विजयन हे अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) अध्यक्षपदासाठी अधिक योग्य उमेदवार आहेत. निवडणूक यादी स्पष्ट झाल्यानंतरच आपण अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याबाबत विचार करू, असे माजी फुटबॉलपटू बायच्युंग भुतियाने स्पष्ट केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘एआयएफएफ’ आगामी निवडणुकांसाठी निवडणूक अधिकाऱ्यांनी ६७ मतदारांची पहिली यादी प्रसिद्ध केली आहे. यात ३१ राज्य संघटनांचे प्रतिनिधी आणि ३६ नावाजलेल्या फुटबॉलपटूंचा समावेश आहे. या यादीतील माजी खेळाडूंच्या इतक्या मोठय़ा संख्येवर जागतिक फुटबॉलची संघटना असलेल्या ‘फिफा’ने नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे काही दिवसांत अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईपर्यंत भुतियाने प्रतीक्षा करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘‘निवडणूक प्रक्रियेत माजी खेळाडूंचा समावेश करण्याचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय स्वागतार्ह आहे. ‘एआयएफएफ’ची नवीन घटना अजून तयार झालेली नसून नक्की कोणाला मतदान करता येणार हे स्पष्ट होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागेल,’’असे भुतिया  म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will hold meeting to decide presidential candidate once electoral list becomes clear says bhaichung bhutia zws
First published on: 16-08-2022 at 02:26 IST