आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) आज पुष्टी केली आहे की पुढील वर्षी होणार्‍या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या मैदानावर खेळवला जाईल, तर २०२५ च्या अंतिम सामन्याचे आयोजन कोण करेल. या संदर्भातील घोषणा आयसीसीने केली आहे. आयसीसीने या संदर्भातील घोषणा करताना अशी माहिती दिली आहे की जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ चा अंतिम सामना लंडनमधील ओव्हल येथे खेळवला जाईल, तर २०२५ च्या अंतिम सामन्याचे आयोजन लॉर्ड्सवर केले जाईल.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना कोणत्या दोन संघांमध्ये खेळला जाईल? न्यूझीलंडकडून कसोटीचे जेतेपद कोणता संघ हिसकावून घेऊ शकेल?  यावर अंतिम फेरीची घोडदौड सुरू असल्यानं अद्याप निर्णय झालेला नाही आणि पुढील वर्षी होणाऱ्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी सर्वच देशांचे कसोटी संघ सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत.

हेही वाचा  : ICC World Test Championship: जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा २०२३ आणि २०२५ चा अंतिम सामन्याचे ठिकाण ठरले…

जागतिक कसोटी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत पोहोचेल का?

भारतीय संघ अंतिम फेरीत पोहोचणार का? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. भारतीय संघ यावेळी २०१९चा अंतिम फेरीतील न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या पराभवाचा वचपा काढू शकेल का? निराशेचे यशात रूपांतर करू शकेल का? यासर्व प्रश्नांची उत्तरं पुढच्या वर्षीच मिळतील. भारतीय संघ सध्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेट चौथ्या स्थानावर आहे. संघाला आता बांगलादेशविरुद्ध २ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामने खेळायचे आहेत. अंतिम फेरीत जाण्याची कोणतीही संधी जिवंत ठेवण्यासाठी भारताला सर्व ६ सामने जिंकावे लागतील. पुढील वर्षी भारत-ऑस्ट्रेलिया मालिका होणार आहे. सध्या दक्षिण आफ्रिका अव्वल, ऑस्ट्रेलिया दुसऱ्या आणि पाकिस्तान तिसऱ्या क्रमांकावर आहे.