Rohit Sharma Record In Last 10 ODI Innings: आगामी वनडे वर्ल्डकप २०२७ स्पर्धेचा थरार दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि झिम्बाब्वेत रंगणार आहे. या स्पर्धेआधी एकच चर्चा रंगली आहे. ती म्हणजे, रोहित शर्मा हा वर्ल्डकप खेळणार का? आज बीसीसीआयची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत रोहित शर्माच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. लॉर्ड्स वनडे सामन्याआधी भारतीय रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधूनही निवृत्त होणार अशी चर्चा रंगली होती. पण इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात रोहितने दमदार शतकी खेळी केली आणि निवृत्तीच्या चर्चांना पूर्णविराम दिला.

माध्यमातील वृत्तानुसार, रोहित शर्माला संघात स्थान द्यायचं की नाही, यावरून बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांमध्ये मतभेद आहेत. लॉर्ड्सच्या मैदानावर शतक झळकावल्यानंतर रोहितने निवृत्तीच्या चर्चांना तर पूर्णविराम दिला. पण तो वर्ल्डकप संघाचा भाग असणार की नाही, हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.

गेल्या १० डावात रोहित शर्माची कामगिरी कशी?

रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेट आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तो केवळ वनडे संघाचा भाग आहे. वनडे क्रिकेटमधील गेल्या १० डावात फलंदाजी करताना त्याने ४५.४ च्या सरासरीने ४५४ धावा केल्या आहेत. या १० डावात फलंदाजी करताना त्याने १०० च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली आहे. रोहित वेगवान सुरूवात करण्यासाठी ओळखला जातो. त्याने अनेकदा वेगवान सुरुवात करून दिली आहे. यादरम्यान त्याने १ शतक आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यांमध्ये रोहितचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता. पण त्यानंतर तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून त्याने दमदार पुनरागमन केलं होतं.

रोहितची गेल्या १० डावातील कामगिरी– ७५,२६,२४,११,१६,४८,७८,११,२६,१३८

इंग्लंडविरुद्धची वनडे मालिका सुरू असतानाच अशी चर्चा रंगली होती की, रोहित वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. पण लॉर्ड्स वनडे सामन्याआधी बीसीसीआय सचिव देवजीत सैकिया यांनी स्पष्ट केलं होतं की, हा रोहितचा शेवटचा सामना नसेल. रोहित दमदार पुनरागमन करेल.