विम्बल्डन टेनिस स्पर्धा : मरे, राडूकानूचे आव्हान संपुष्टात; त्सित्सिपास, अल्काराझ, सिन्नर, श्वीऑनटेक, जाबेऊर, बदोसा यांची आगेकूच

तीन ग्रँडस्लॅम विजेता अँडी मरे आणि गतवर्षीच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेची विजेती एमा रॅडूकानू या ब्रिटिश खेळाडूंचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले.

एमा रॅडूकानू
एमा रॅडूकानू

लंडन : तीन ग्रँडस्लॅम विजेता अँडी मरे आणि गतवर्षीच्या अमेरिकन खुल्या स्पर्धेची विजेती एमा रॅडूकानू या ब्रिटिश खेळाडूंचे विम्बल्डन टेनिस स्पर्धेतील आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत २०व्या मानांकित अमेरिकेच्या जॉन इस्नरने मरेवर ६-४, ७-६ (७-४), ६-७ (३-७), ६-४ अशी सरशी साधली. अन्य लढतीत, स्पेनचा युवा प्रतिभावान खेळाडू कार्लोस अल्कराझने नेदरलँड्सच्या टॅलन ग्रीक्सपूअरला ६-४, ७-६ (७-०), ६-३ असे सरळ सेटमध्ये पराभूत केले. इटलीच्या यानिक सिन्नरने स्वीडनच्या मिकाइल यमेरवर ६-४, ६-३, ५-७, ६-२ अशी, तर नवव्या मानांकित कॅमरून नॉरीने क्वामे मुनारवर ६-४, ३-६, ५-७, ६-०, ६-२ अशी मात केली.  

महिला एकेरीच्या दुसऱ्या फेरीत १०व्या मानांकित रॅडूकानूने फ्रान्सच्या कॅरोलिन गार्सियाकडून ३-६, ३-६ अशी हार पत्करली. ओन्स जाबेऊरने मात्र अप्रतिम खेळ करताना पोलंडच्या कावाचा ६-४, ६-० असा धुव्वा उडवत तिसरी फेरी गाठली. तसेच पॉला बदोसाने रोमेनियाच्या एरिना बारावर ६-३, ६-२ अशी मात केली. मारिया सक्कारीनेही आगेकूच करताना व्हिक्टोरिया टोमोव्हाचा ६-४, ६-३ असा पराभव केला.

मिर्झा-हरादेका पराभूत

भारताची सानिया मिर्झा आणि तिची चेक प्रजासत्ताकची साथीदार लुसी हरादेका या सहाव्या मानांकित जोडीवर पोलंडची माग्दालेना फ्रेंच आणि ब्राझीलची बिएट्रीझ हदाद माइ या बिगरमानांकित जोडीने ६-४, ४-६, २-६ अशी मात केली.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Wimbledon tennis tournament murray radukanu challenge ends grand slam winner ysh

Next Story
रोहितबाबत संभ्रम!; इंग्लंडविरुद्ध पाचव्या कसोटीसाठी भारताच्या चिंतेत भर
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी