नुकतीच झालेली विंडीजविरुद्धची मालिका भारताने २-० अशी जिंकली. या मालिकेतील एकही सामन्यात विंडीजकडून तोडीचा खेळ करण्यात आला नाही. यानंतर विंडीजच्या संघावर प्रचंड टीका करण्यात आली. या दरम्यान, दुसऱ्या सामना संपल्यानंतर विंडीजने प्रशिक्षक स्टुअर्ट लॉ यांचावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण ही कारवाई सामना किंवा मालिका गमावल्यामुळे करण्यात आली नसून सामन्यादरम्यान आचारसंहितेचा भंग केल्यामुळे करण्यात आली आहे. लॉ यांना ३ डिमेरीट पॉईंट्स आणि सामन्याच्या मानधनाच्या १०० टक्के दंड ठोठवण्यात आला आहे.

सामन्यातील एक निर्णय न पटल्यामुळे लॉ यांनी तिसऱ्या पंचांवर आणि सामानाधिकारी यांच्यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्यांच्यावर हि कारवाई करण्यात आली आहे. पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांसाठी हे निलंबन करण्यात आले आहे.

विंडीजचा फलंदाज कायरन पॉवेल याचा अश्विनच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने स्लिपमध्ये झेल घेतला. पॉवेलच्या बॅटची कड लागून चेंडू रहाणेकडे गेला होता. अजिंक्यने तो झेल टिपला. पण चेंडू अतिशय जमिनीलगत असल्याने तो झेल आहे कि नाही, याबाबत तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. तिसऱ्या पंचांनी पॉवेलला बाद ठरवले. त्यानंतर त्याने तिसऱ्या पंचांच्या रूममध्ये जाऊन निर्णयावर नाराजी व्यक्त केली आणि सामानाधिकाऱ्यांच्या बाबत चुकीचे वक्त्यव्य केले.
त्यामुले त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान, लॉ हे डिसेंबरपर्यंत विंडोजसोबत असणार आहेत. त्यानंतर इंग्लिश काऊंटी क्रिकेटमधील मिडलसेक्स या संघाचे प्रशिक्षक म्हणुन ते रूजू होणार आहेत. त्यांनी आपल्या प्रशिक्षपदाचा राजीनामा आधीच क्रिकेट बोर्डाकडे सोपवला आहे.